Monday, 7 August 2023

कोकण युवा सेवा संस्था रजि. व निसर्गप्रेमी फाउंडेशन (बदलापूर) यांच्या वतीने दरवर्षी दहा झाडे लावण्याच्या संकल्प !!

कोकण युवा सेवा संस्था रजि. व निसर्गप्रेमी फाउंडेशन (बदलापूर) यांच्या वतीने दरवर्षी दहा झाडे लावण्याच्या संकल्प !!

मुंबई - ( दिपक कारकर )

कोकण युवा सेवा संस्था रजि. व निसर्गप्रेमी फाउंडेशन (बदलापूर) यांच्या संलग्न विद्यमानाने दिनांक २३ जुलै २०२३ रोजी कोकण युवा सेवा संस्थेच्या खजिनदार संजना संजय बेंद्रे यांच्या संकल्पनेतून व संस्थापक/अध्यक्ष अभिजीत कोटकर आणि निसर्गप्रेमी फाउंडेशन चे अध्यक्ष अनिल लब्दे यांच्या मार्गदर्शनाने आंबेशिव पाचोण (बदलापूर) येथे वनसंवर्धन दिनी वृक्षारोपण करण्यात आले.

नुकतीच झालेली रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीची घटना पाहता वृक्षारोपण व वनसंवर्धन करणे किती महत्वाचे आहे याविषयी अनिल लब्दे यांनी मौलिक मार्गदर्शन केले.त्यावर उपक्रमातील उपस्थितीतातून वनसंवर्धनाची शपथ घेऊन भविष्य काळात प्रतिवर्षी किमान १० झाडे  लावण्याचा निर्धार करण्यात आला, सदर वृक्षारोपण प्रसंगी निसर्गप्रेमी इन्व्हार्नमेंट फाउंडेशन ची टीम व कोकण युवा सेवा संस्था रजि.चे संस्थापक/ अध्यक्ष अभिजित कोटकर, खाजिनदार संजना बेंद्रे पदाधिकारी अनिल गावडे महेंद्र घडशी व सदस्य -रुपेश कोलते, संजोग बेंद्रे ,प्रज्ञा गावडे, अनिल मुखनाक, दयानंद सोनताटे, संयोगिता सोनताटे, दिव्यांजली सोनताटे, निखिल मुकनाक, कांचन गांगुर्डे उपस्थित होते. तर संस्थेच्या वतीने श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर- रुपेश चंद्रकांत कोलते, डी एस इंटरप्रायजेस पी एफ कन्सल्टंट- दयानंद सोनताटे यांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !!

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !! उरण मध्ये फसवणूक करून जमीन विक्री करणारी बनावट टोळी सक्रिय. सीबीडी पोलीस ठाण्यात ...