Monday 11 September 2023

सेवेची दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव मुंबई यांचा सामाजिक उपक्रम !!

सेवेची दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव मुंबई यांचा सामाजिक उपक्रम !!

मुरबाड, सचिन भोईर : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव मुंबई येथे सन 2013 साली पोलीस दलात भरती झालेल्या अंमलदार यांना सेवेची दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्नेहसंमेलन आयोजित केले होते. 

    या स्नेहसंमेलनामध्ये कोणताही वायफळ खर्च न करता सर्व 200 पोलिस अमलदार यांनी स्वखर्चाने मुरबाड येथील काचकोली येथील शासकीय आश्रम शाळेतील 368 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दैनंदिन वापरातील साहित्य व मुलांच्या मनोरंजनासाठी टेलिव्हिजन संच तसेच आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांना भोजनाचा उपक्रम राबविला.

   जनमानसांमध्ये पोलिसांप्रतीची आदर भावना जागरूक व्हावी या उद्देशाने  सामाजिक भान ठेवून पोलीस दलातील सेवेसाठी भारती झालेल्या तरुणांनी एकत्र  येत केलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच कार्यक्रम होता. फक्त पोलीस सेवेतूनच  समाजसेवा न करता गरजू  विद्यार्थ्यांना देखील  मदत करून आपले सामाजिक कर्तव्य बजावण्याचे काम देखील केले.

    स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये  पोलिस अंमलदार यांना भरती झाल्यानंतर पोलीस खात्यासंदर्भाचे सर्व प्रशिक्षण देणारे सेवानिवृत्त सहाय्यक समोपदेशक राजेंद्र राऊत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्र.8 गोरेगाव मुंबई येथे सन 2013 साली भरती झालेले  सर्व पोलिस अंमलदार हजर होते. त्याच  बरोबर शाळेचे मुख्याध्यापक इतर शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा !

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा ! (विकासक प्रशांत शर्मा यांच्या बांधकाम प्रकरणी डॉ. माकणीकर यांची मागणी.) ...