कल्याण मुरबाड मार्गावर पावशेपाडा येथे गाड्याची अनाधिकृत पार्किंग, रस्ता कोणासाठी? पोलिसांचे दुर्लक्ष !
कल्याण, (संजय कांबळे) : म्हारळ, वरप, कांबा या गावातील ग्रामस्थांसह विविध सामाजिक संस्था, संघटना, आदीच्या प्रचंड आंदोलनामुळे कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान जवळपास चार पदरी रस्त्याचे काम मार्गी लागले खरे पण याच मार्गावर पावशेपाडा येथे मोठमोठ्या ट्रँवर्ल च्या बसेस पार्क केल्याने हा महामार्ग नक्की कोणासाठी?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे शेकडो वाहतुकीचे नियम लावणारे पोलीस हे रस्त्यावरील पार्किंग कोणत्या नियमांत बसवतात हे त्यांनाच माहीत.
ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत, त्यातल्या त्यात कल्याण मुरबाड रस्ता थोडासा बरा आहे, परंतु याच रस्त्यावरील पाचवामैल ते म्हारळपाडा दरम्यानचा रस्ता काही महिन्यापुर्वी जीवघेणा ठरत होता. या रस्त्यावरील म्हारळ, वरप, कांबा, यांच्या सह परिसरातील ग्रामस्थ, विविध संस्था, संघटना, वाहन चालक यांनी वरप येथील सेक्रेट हार्ट स्कूलचे सीईओ अलबीन सर यांच्या नेतृत्वाखाली या रस्त्याबद्दल प्रचंड आंदोलन केले, त्याचा परिणाम म्हणून म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान चार पदरी कामाला सुरुवात झाली, काही अपवाद वगळता एक लाईन तर सुरळीतपणे सुरू झाली.
परंतु दुसरी लाईन अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. कांबा येथील स्मशानभूमी समोरच्या मोरीचे काम अपुरे आहे. ब-याच ठिकाणी डिवायडर लावण्यात आलेले नाही. असे असले तरी या मार्गावरून दररोज हजारो छोटी मोठी वाहने येजा करत असतात, असे असताना पावशेपाडा बस थांबा समोर व ताबोर आश्रम बाजूला पाचवामैल पर्यंत मोठमोठ्या ट्रव्हर्ल कंपनीच्या बसेस अनाधिकृत पणे पार्किंग करण्यात आल्या आहेत. या मध्ये छोट्या कार देखील आहेत, यामुळे मुरबाड कडून कल्याण च्या दिशेने येणारी एक लाईन पुर्णपणे बंद झाली आहे. शिवाय यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
दुर्दैवाची व आश्चर्याची बाब म्हणजे हा भाग किंवा हद्द उल्हासनगर शहर वाहतूक शाखेच्या हद्दीत येत नाही. त्यामुळे ते खांदे उडवायला मोकळे? दुसरी गोष्ट म्हणजे कल्याण तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत हा परिसर येतो खरा परंतु त्यांच्या कडे वाहतूक पोलीस किती व कोठे असतात हे काय कळायला मार्ग नाही. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे ब-याच वेळी कल्याण आरटीओ ची गाडी या मार्गावरून पुढे जाते, पण त्यांना हे अनाधिकृत पार्किंग दिसते असे मुळीच वाटत नाही. त्यामुळे सध्या या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहून चालक, प्रवास, नागरिक, ग्रामस्थ वाहतूक कोंडीचा, त्रास झाला, काही अपघात घडला तर याला कोण जबाबदार?
No comments:
Post a Comment