भगवान श्री जिव्हेश्वर जयंती उत्सव २०२३ ला उत्स्फूर्त प्रतिसाद !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
भगवान श्री जिव्हेश्वर जयंती उत्सव २०२३ नुकताच राजे संभाजी हॉल, मुलुंड (पूर्व ) येथे पार पडला. अतिशय सुंदर नियोजन, संपूर्ण कार्यक्रमाला दृष्ट लागेल अशा या कार्यक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व प्रथम जन्मोत्सव ग्रंथ वाचन श्रीराम वैद्य (गुणवंत कामगार /पत्रकार /सामाजिक कार्यकर्ता) यांनी केले. त्यांनी आपल्या मधुर आवाजाने संपूर्ण हॉल मध्ये भक्त्तिमय वातावरण जागृत केले. सौ. व श्री.शैलेश भोबेकर या उभयतांच्या हस्ते जन्मोत्सव पूजेचा बहुमान दिला होता. त्यानंतर भव्यदिव्य पालखी सोहळा पार पडला. प्रथम पालखी उचलण्याचा बहुमान अध्यक्ष अजित साळी व शैलेश भोबेकर यांना देण्यात आला. या कार्यक्रमामध्ये लहान व वयवृद्ध सर्व समाज बांधव यांनी उपस्थित राहून कार्यक्रम द्विगुणित केला. त्यानंतर सत्कार कार्यक्रम, गुणगौरव सोहळा, जेष्ठ नागरिक सत्कार असे एका पाठोपाठ एक कार्यक्रम पार पडला. उत्कृष्ट सूत्रसंचालनसह हा कार्यक्रम वेळेत पार पडला.
यावर्षी संपूर्ण अल्पोपहार व भोजनचा खर्च मा. श्री. चंद्रकांतजी हावरे ( मामाश्री ) यांनी दिला. त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. यावर्षी महाप्रसादाने मन अतिशय तृप्त वाटले. सर्वांनी आनंदाने या प्रसादाचा आस्वाद घेतला. खरी कसरत होती ती कार्यकर्त्यांची कारण भोजन ठिकाणी हॉल, देणगी काउंटर, आलेले निमंत्रित पाहुणे यांचे आगत - स्वागत फार बारकाहीने लक्ष देऊन जबादारीने काम केले. त्यामुळे या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. त्यानंतर मनोरंजन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाने उपस्थित सर्वाची मने जिंकली. प्रत्येक कलाकृतिचे गुण -गाण गाणे, वर्णन करायला शब्दच अपुरे पडतील. श्री गणेश व भगवान जिव्हेश्वर कृपेनें इतका जल्लोष होता की, सर्वजण कार्यक्रमात तल्लीम झाले होते. डायबेटीस ज्यांना आहे, त्यांना सुद्धा आपण जेवण करावे याचे आठवण नव्हती. त्यांना कार्यकर्ते भोजनाला घेऊन जात होते. इतका छान सूत्रसंचालन व कलाकारांची एन्ट्री पहिलंदाच पहायला मिळाली.
अप्रतिम कार्यक्रमाचे यथोचित समालोचन व वृत संकलन आपल्या ओजस्वी शब्दात मांडणी करून विशेष म्हणजे कार्यक्रमाचा दर्जा प्रोफेशनल वाटत होता त्यामुळे सदाबहार रंगतदार मनाला आनंद देणारा दिमाखदार खुर्चीला चिकटून ठेवणारा सांस्कृतिक, शिवशाही काळात घेऊन जाणारा, श्रावण महिन्यातील मंगळागौर सादरीकरण तसेच निवेदन खूप सुंदर सोबत मराठी हिंदी जुन्या काळातील गाजलेली गाणी सादर करणारे गायक तसेच या सर्वांना सहकार्य करणारे सहकारी विशेष म्हणजे कार्यक्रम बघणारे दर्दी समाज बांधव व भगिनी यांना सुद्धा श्रेय जाते असे मत पत्रकार श्रीराम वैद्य यांनी बोलताना व्यक्त केले.कलाकारांना आर्थिक स्वरूपात प्रोत्साहन देऊन त्यांना दाद देणारे आपले समाज बांधव यांचे सुद्धा आभार मानले.रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ मुंबई वतीने यंदा प्रथमच श्री. उल्हास दांडेकर (तात्या) यांच्या संकल्पनेतून भगवान श्री जिव्हेश्वर जन्म उत्सव दिनी पालखी सोहळाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी शिस्तबद्ध पध्दतीने अंदाजे १२० समाज बांधव व भगिनी यांनी सहभाग घेतला. उत्तम जिव्हेश्वर नाम गजरात आनंद साजरा केला. राजू तांबडे यांनी व सर्व कालाकारांनी घेतलेली मेहनत व त्यांना कार्यकारी मंडळ, आणि त्यांचा परिवारानी व उपस्थित प्रेक्षक यानी दिलेला प्रतिसाद या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. अजितदादा आणि टीम, सर्व हितचिंतक, सल्लागार यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment