Monday 11 September 2023

दिवा शहरात शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे दारू विक्री सुरू !!

दिवा शहरात शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे दारू विक्री सुरू !!


ठाणे, विकास जगताप : सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा शहरात मोठया प्रमाणावर सर्रासपणे बेकायदेशीर विक्री होणाऱ्या गावठी हातभट्टी (पन्नीच्या) दारूमुळे आजवर अनेक कुटुंब उद्धवस्थ झाले आहेत.

दिवा शहराची भौगोलिक रचना ही ग्रामीण भागाची असली तरी मागील काही वर्षात दिव्याच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झालेली व शहरीकरण झालेले आपल्याला पाहायला मिळते दिवा शहरात राहणारा बहुतांश नागरिक हा रोज कामावर जाऊन रोजंदारीवर काम करून आपले व आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणारा आहे.अशा परिस्तिथीत दिवा शहरात सर्वत्र गावठी दारू व अत्यंत घातक रसायन वापरून बनवण्यात येणारी पन्नीची दारू तयार करून ती मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत असून, सहज मिळणाऱ्या या दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होऊन त्यांना वेग वेगळे आजार होऊन त्यांचे जीवन नष्ट व कुटुंबियांचे संसार उध्दवस्थ होत आहे. 

शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून दिव्यात राजरोसपणे दारू विक्री सुरू आहे यामधून मिळणारे लाखो रुपयांची मिळकतीत दिव्यातील राजकारणात सहभागी असणारे महाभाग व प्रशासनाचा किती हिस्सा आहे,हा दिव्यातील जनतेचा चर्चेचा विषय बनला आहे, तसेच दिव्यातील जनतेच्या म्हणण्यानुसार आमच्या येणाऱ्या पिढीचे भवितव्य धोक्यात असल्याचे सांगत प्रशासनाने ह्याबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी मा.मुख्यमंत्री,गृहमंत्री व पोलीस प्रशासनाकडे शहरातील नवीन वस्तीतील सुजाण नागरिक विविध माध्यमातून करत आहेत. 

तसेच दिव्यातील महिला भगिनींनी पोलिस प्रशासन व महापालिका आयुक्त, तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती केली आहे की, आमचा संसार उदवस्त होण्या पासून वाचववा, यानंतर सर्व दिव्यातील जनतेचे लक्ष प्रशासनाच्या वतीने होणाऱ्या कारवाईवर लागले आहे,

No comments:

Post a Comment

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा !

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा ! (विकासक प्रशांत शर्मा यांच्या बांधकाम प्रकरणी डॉ. माकणीकर यांची मागणी.) ...