Monday 11 September 2023

४० मजली इमारतीच्य टेरेस वरून खाली येताना लिफ्ट कोसळून ७ कामगारांचा मृत्यू !

४० मजली इमारतीच्य टेरेस वरून खाली येताना लिफ्ट कोसळून ७ कामगारांचा मृत्यू !

भिवंडी, दिं,११,अरुण पाटील(कोपर)
         ठाण्यातील बाळकुम येथील  रुणवाल गार्डन, नारायणी स्कूलच्या बाजूला, हायलँड पार्क, येथील  एका ४० मजली इमारतीच्या टेरेस वरील वॉटर प्रुफिंगचे काम करुन खाली येताना लिफ्ट कोसळून ७ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
         लिफ्ट कोसळल्यानंतर एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी धावाधाव करत अग्नीशमन दलाला माहिती कळविली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागानाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. 
        या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. सदर या ४० मजली इमारतीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले होते पूर्ण झालेल्या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटर प्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला. 
        घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला कळवली. तातडीने बाळकुम अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती घटनास्थळी टीमसह पोहोचले. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. 
        बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी दोन कामगारांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. यातील दोन  कामगाराचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. 
         स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी लिफ्टचे कंत्राटदारांना व साईट इन्चार्जना दोषी ठरवून कडक कारवाईची मागणी केली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या वरिष्ठ पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन पंचनामा करत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. लिफ्ट कोसळल्यानंतर या परिसरात मोठ्याने आवाज झाला. या ठिकाणी काम करत असलेले इतर कामगार अपघाताच्या स्थळी पोहोचले.
       लोखंडी दरवाजे असलेल्या या लिफ्टला तोडून बाहेर काढण्यासाठी वेळ लागला. त्यानंतर मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांकडे सुरक्षा उपकरणांचा अभाव घटनास्थळी दिसून आला. स्थानिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केलीय. जर सुरक्षेच्या उपाययोजना असत्या तर बळींची संख्या कमी झाली असती असा अंदाजदेखील स्थानिकांनी वर्तविला.
       सुनिल कुमार दास (पु / वय २१ वर्षे ) असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर महेंद्र चौपाल (३२ वर्षे ), रुपेश कुमार दास ( २१ वर्षे ), हारून शेख (४७ वर्षे ), मिथलेश (३५ वर्षे ) आणि कारिदास (३८ वर्षे ) अशी मृतांची नावे आहेत. मृतामधील सहाव्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही. ४० मजल्यावरून खाली येताना लिफ्टचा रोप तुटल्याने अपघात होऊन लिफ्ट भूमिगत पार्किंगच्या बेसमेन्टमध्ये कोसळली होती.
      या वेळी अग्निशमन दलाचे जवान ०१ - इमर्जन्सी टेंडर व ०७ - रुग्णावाहिकांसह घटनास्थळी उपस्थित होते. लिफ्टमधून बाहेर पडताना आणि चढताना सावधानतेने पावले टाकण्याची आवश्यकता असते. लिफ्ट चालू असताना मध्येच थांबविण्यासाठी हात किंवा कोणत्याही वस्तुचा वापर करणे धोक्याचे असते. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती असल्यास तांत्रिक बिघाड होण्याची भीती असते. त्यामुळे लिफ्टमध्ये गर्दी करणे टाळा.

No comments:

Post a Comment

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा !

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा ! (विकासक प्रशांत शर्मा यांच्या बांधकाम प्रकरणी डॉ. माकणीकर यांची मागणी.) ...