Sunday, 10 September 2023

पालशेत गावची सुकन्या कु.आर्या तेरेकर ऑनलाईन नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने विजयी !!

पालशेत गावची सुकन्या कु.आर्या तेरेकर ऑनलाईन नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने विजयी !!

मुंबई, उदय दणदणे :

मुंबई चेंबूरस्थित राहणारी गुहागर तालुक्यातील पालशेत गावची रामाणेवाडीतील कु.आर्या महेंद्र तेरेकर वय वर्ष १० इयत्ता पाचवीत शिकणारी स्वामी मुक्तानंद हायस्कूल (चेंबूर) मुबंई शाळेची विद्यार्थिनी असणाऱ्या चिमुकलीने महाराष्ट्र न्यूज 18 आयोजित महा डान्सर २०२३ ऑनलाइन नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट नृत्यकला सादरीकरण करून द्वितीय क्रमांकाने विजयी झाल्याबद्दल आदर्श मुंबई- महाराष्ट्र न्यूज 18 च्या ७0व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे बिगबॉस फेम तसेच सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी (दादूस) यांच्या शुभहस्ते कु.आर्या तेरेकर हिला द्वितीय क्रमांक प्रति एक हजार रुपयांचे पारितोषिक व सन्मानपत्र,0सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. समता डान्स ॲकाडीमी (चेंबूर) येथे सध्या ती नृत्यकला शिकत असून शालेय अभ्यासातही तीची प्रगती उत्तम असल्याचे व तिला चित्रकलाची आवड असून अनेक स्पर्धेत ती हिरगिरीने सहभागी होत असल्याचे तिचे वडील महेंद्र तेरेकर व आई शोभा तेरेकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले

No comments:

Post a Comment

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥ माणगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा कंबर कसूया आपल्या काळ्या आईला हिरवेगार करूया :  किरण पडवळकर तालु...