Sunday 10 September 2023

कोपर्डी प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्याने केली आत्महत्या !!

कोपर्डी प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्याने केली आत्महत्या !!

भिवंडी, दिं,१०, अरुण पाटील (कोपर) :
          संपुर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी बलात्कार हत्त्या कांडातील आरोपी जितेंद्र.शिंदे याला 
जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्याने पुण्यातील कारागृहातील बॅरकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
         आज (दिं.१०) रोजी पहाटेच्या सुमारास पोलिस गस्तीसाठी गेले असताना हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
         अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची अहमदनगर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा दिली होती. यावेळी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारच्या वतीने पीडितेची बाजू मांडली होती.
         दरम्यान, कोपर्डीतील पीडित कुटुंबासाठी राज्य सरकारने सकारात्मक पावलं उचलली होती. पीडितेच्या भावाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोकरी दिली होती. कोपर्डीतील निर्भयाच्या भावाला महसूल विभागात नोकरी देण्यात आली होती. तो 2019 मध्ये कर्जतच्या तहसीलदार कार्यालयात शिपाईपदावर रूजू झाला होता.
          कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून खून केल्याबद्दल तिघा जणांना फाशीची शिक्षा झाली होती. जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याच्या कुकृत्याने कोपर्डी गाव हादरले होते. ही घटना १३ जुलै २०१६  रोजी घडली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २५, रा. कोपर्डी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले होते.
          शालेय मुलीवर निर्दयीपणे अत्याचार करून राक्षसी वृत्तीने तिचा खून केला, ही घटना कोणाही सामान्य माणसाला संताप आणणारी होती. त्यामुळेच आरोपी नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ यांच्यावर न्यायालयाच्या जुन्या इमारत परिसरात दोनदा हल्ला झाला होती. तर न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या आवारात ‘शिवबा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सशस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी

1. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला विनयभंग प्रकरणी 3 वर्षे सक्तमजुरी, बलात्कार व कटात सहभाग प्रकरणात जन्मठेप, 20 हजारांचा दंड, खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याने आज आत्महत्या केली आहे.

2. संतोष भवाळ गुन्ह्यास प्रोत्साहन, विनयभंग- 3 वर्षे सक्तमजुरी, बलात्कारास प्रोत्साहन- जन्मठेप, 20 हजार दंड. न भरल्यास 3 वर्ष कैद.कट सहभाग, खून, गुन्ह्यास प्रोत्साहन फाशीची शिक्षा.

3. नितीन भैलुमे याला कट रचला, बलात्कारास प्रोत्साहन म्हणून जन्मठेपेच्या शिक्षेसह 20 हजार दंड. दंड न भरल्यास 3 वर्षे साधी कैद. तर कटात सहभाग, खुनास प्रोत्साहन फाशीची शिक्षा देण्यात आली

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...