Friday, 1 September 2023

एका भाऊ हजारो बहिणी पालघर जिल्ह्यात पार पडले अनोखे रक्षाबंधन !!

एका भाऊ हजारो बहिणी पालघर जिल्ह्यात पार पडले  अनोखे रक्षाबंधन !!

एक राखी समाजकार्यासाठी जिजाऊच्या निलेश भाऊंसाठी...

पालघर, प्रतिनिधी : रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण असे नेहमीच म्हटले जाते. असे असले तरी दिवसेंदिवस नाते सबंध आणि भाव भावना बोथट होत असलेल्या आजच्या या युगात खऱ्या अर्थाने ही नाती जपताना फारच कमी जण पाह्यला मिळत आहेत. मात्र दुसरीकडे कुठेलेही रक्ताचे नाते नसताना केवळ सामाजिक जाणीवेच्या भावनेतून या नात्यांना खऱ्या अर्थाने निभावत असल्याचे एक आगळे वेगळे उदाहरण पालघर जिल्ह्यात असलेल्या  विक्रमगड तालुक्यातील झडपोली गावाच्या जिजाऊ नगरीत दरवर्षी पाह्यला मिळते. येथील एका भावासाठी ठाणे पालघर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्यने बहिणी रक्षाबंधन करायला दरवर्षी या ठिकाणी येत असतात. 

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्थेच्या माध्यमातून एक अनोखे रक्षाबंधन हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या पालघर जिल्ह्यात  असलेल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील निवासस्थानी करण्यात आला होता.  यावेळी ठाणे पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मोठ्या संख्यने महिला या रक्षाबंधन कार्यक्रमाला उपस्थित राहून भाऊ मानलेल्या निलेश सांबरे यांना रक्षाबंधन करण्यासाठी उपस्थित होत्या .

समाजात प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या सुटाबुटात राहणाऱ्या अनेकांचा अनेकवेळा सन्मान केला जातो मात्र खऱ्या अर्थाने तळागाळात जाऊन काम करणारे असंख्य हात आपल्या  समाजासाठी अहोरात्र झटत असतात. म्हणूनच आपला समाज निकोप, सुरक्षितपणे श्वास घेत असतो. याचीच जाणीव ठेवून  आशा वर्कर्स, आरोग्य सेविका आणि महिला पोलिस भगिनी ज्यांनी कोरोनाकाळात जिवाची बाजी लावून कार्य केले अशा बहिणींकडून राखी बांधून प्रतिवर्षी कृतज्ञतेची भाऊबीज साजरी करण्यात येत असते तर त्याच अनुषंगाने एक अनोखे रक्षाबंधन हा कार्यक्रम देखील हजारोंच्या संख्यने असलेल्या बहिणींच्या उपस्थितीत करण्यात येत असतो. याहीवर्षी हजारोंच्या संख्यने तीच आपुलकीची गर्दी निलेश सांबरे यांना रक्षाबंधन करण्यासाठी जमलेली पाह्यला मिळाली . 

मागील वर्षी झालेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात आशाताई स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मानधनवाढी बाबतच्या व इतर समस्यांबाबत निलेश सांबरे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले होते. त्यावेळी एक भाऊ म्हणून आपण संस्थेच्या माध्यमातून सरकार दरबारी तुमचे म्हणणे पोहचवून त्यावर उपायोजना करण्यासाठी नक्की प्रयत्न करेन असा शब्द सांबरे यांनी आपल्या या उपस्थित बहिणींना दिला होता आणि तो पूर्ण देखील केला होता. जिजाऊ संस्थेच्या मागणीची सरकारने दखल घेत आशाताई आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली. या ही वर्षी रक्षाबंधन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या बहिणींना काही समस्या असतील तर त्या आपण ऐकून त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

शिवस्फूर्ती प्रगती मंडळाच्यावतीने शैक्षणिक साहित्यांचे वाटप !!

शिवस्फूर्ती प्रगती मंडळाच्यावतीने शैक्षणिक साहित्यांचे वाटप !! घाटकोपर, (केतन भोज) : सामाजिक,शैक्षणिक,क्रिडा क्षेत्रात अग्रेसर अ...