Friday, 1 September 2023

जिजाऊ नगरीत सलग ३ दिवस सर्व भेदाभेद विसरून जाती – धर्माच्या पलीकडे जाणारे रक्षाबंधन !!

जिजाऊ नगरीत सलग ३ दिवस सर्व भेदाभेद विसरून जाती – धर्माच्या पलीकडे जाणारे रक्षाबंधन !!

*संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याची* 

सलग तिसऱ्या दिवशीही हजारोंच्या संख्येने महिलांची "निलेश सांबरे" यांना रक्षाबंधन करण्यासाठी गर्दी.....

पालघर, प्रतिनिधी : वेळेला जिथे रक्ताची नातीही परकी होतात. तिथे जिजाऊ नगरीत सलग ३ दिवस पार पडत असलेले अनोखे रक्षाबंधन हे सर्व भेदाभेद विसरून जाती – धर्माच्या पलीकडे जाऊन समाजासमोर एक वेगळे उदाहरण ठरत आहे. जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्थेच्या माध्यमातून एक अनोखे रक्षाबंधन पार पडले. सलग तिसऱ्या दिवशीही त्याच आपुलकीने तेवढीच गर्दी जिजाऊ नगरीत असलेल्या संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या निवासस्थानी पाह्यला मिळाली. अगदी सकाळपासूनच रक्षाबंधनाच्या तिसऱ्या दिवशीही सांबरे यांना राखी बांधण्यासाठी आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिलावर्ग उपस्थित होता.

निलेश सांबरे यांच्याबद्दल असलेल्या प्रेमापोटी २८ ऑगस्ट ते दिनांक १ सप्टेंबर या कालावधीत ३ दिवस झडपोली येथील जिजाऊ नगरीत महिला वर्गाचा येणारा ओघ वाढतच होता.  रक्षाबंधनच्या  दिवशी म्हणजेच या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी दिनांक ३० ऑगस्ट रोजी २००० च्या वर महिला निलेश सांबरे यांना राखी बांधण्यासाठी उपस्थित होत्या . दुसऱ्या दिवशी देखील हजारोंच्या संख्येने ठाणे पालघर जिल्ह्यासह कोकणातील विविध भागांतून महिला निलेश सांबरे यांना राखी बांधण्यासाठी उपस्थित होत्या. तरआज तिसऱ्या दिवशी ही तीच अलोट गर्दी या कार्यक्रमात पाह्यला मिळाली .

२००८ साली जिजाऊ नावाची ही संस्था निलेश सांबरे यांनी विक्रमगड तालुक्यातील एका लहानश्या दुर्गम गावात चालू केली. एक एक करता करता त्यांनी या ठिकाणी अनेक उपक्रम चालू केले. गोर गरीब रुग्णांना उपचार मिळावेत. पैशांअभावी कोणाचाही जीव जावू नये म्हणून श्री. भगवान महादेव सांबरे हे १३० बेड्सचे मोफत रुग्णालय चालु केले. तर इथले कुठलेही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये, इथल्या गोरगरीबांच्या मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ८ सीबीएसई बोर्डाच्या मोफत शाळा सुरु केल्या, दिव्यांग मुलांसाठी मोफत निवासी शाळा सुरु केली ज्यात आज १०५ मुलांचे पालकत्व संस्थेने घेतले आहे. इथल्या गोर गरीबांची मुलंही अधिकारी म्हणून उच्च पदावर पोहचली पाहिजेत यासाठी ४४ ठिकाणी  युपीएससी / एमपीएससी स्पर्धा परीक्षा मोफत वाचनालय सुरु केले आहेत. २१ ठिकाणी मोफत  पोलीस अकॅडमी / याचबरोबर इथल्या माता – भगिनी सक्षम व्हाव्यात या दृष्टीने ठाणे, पालघर जिल्ह्यासह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिरे देखील वर्षभर विविध  ठिकाणी राबवले जातात . अडल्या नडल्या अनेक अडचणीत असलेल्या महिलांना एक भाऊ म्हणून अनेक वेळेला निलेश सांबरे आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या मदतीसाठी धावून जात असतात. त्याचीच जाणीव ठेवून अनेक महिला आपल्या या लाडक्या  भाऊरायाला म्हणजेच निलेश सांबरे यांना राखी बांधण्यासाठी अगदी सकाळपासुनच भल्या मोठ्या रांगेत उभ्या असतात. ही गर्दी यावर्षी इतकी होती की सलग तीन दिवस रक्षाबंधनाचा हा सोहळा चालू होता. तर निलेश सांबरे हे देखील आलेल्या आपल्या प्रत्येक बहिणीचा आदर- सन्मान राखत, आस्थेने विचारपूस करत होते. आपल्या सामाजिक कार्याने निलेश सांबरे यांनी आपले वेगळे असे स्थान जनमानसात मिळविले आहे. तीन दिवस चालू असलेला हा एक भाऊ आणि हजारो बहिणींच्या रक्षाबंधनाचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. 

वर्षभर गोरगरीबांसाठी अहोरात्र धावणाऱ्या आपल्या या भावाला जमलेल्या हजारो बहिणीनी अनेक आशीर्वाद देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सध्या या आगळ्या वेगळ्या अनोख्या रक्षाबंधन कार्यक्रमाचे कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आधार कार्ड शिबिरांचे आयोजन !!

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आधार कार्ड शिबिरांचे आयोजन !! कल्याण लोकसभा मतदारसंघात हजारो नागरिकांना आधार कार्डा ...