बदलापूर, प्रतिनिधी : कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्व सामान्य कुटुंबातील मुलगा सरपंच ते आमदार असा प्रवास केलेले विकासाच्या माध्यमातून मतदार संघातील जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे मुरबाड तालुक्याचे सुपुत्र, बदलापूर शहराला कर्मभूमी मानणारे आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानी बदलापूर येथे किसन कथोरे यांनी आमदार म्हणून १९ वर्षे पूर्ण केली व राजकीय जीवनांतील ४२ वर्षे यानिमित्ताने विकासपर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात ऑडिओ, व्हिडिओ क्लिप या मधून आमदारांचा राजकीय जीवनाचा प्रवास व जेष्ठ पत्रकार भूषण करंदीकर यांच्या सोबत वार्तालाप ज्यामधून आमदारांनी त्यांनी राजकीय जीवनात केलेल्या विकास कामांची विधवा महिलांच्या मुलींच्या लग्नाची संपुर्ण जबाबदारी घेणे, बदलापूर शहर लोडशेडींग मुक्त करणे, ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, पाइपलाइन द्वारे घराघरात पाणी पुरवठा, बारावी डॅम परियोजना पुर्ण, असंख्य रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन, डोळे तपासणी व चष्मा वाटप सर्व मोफत, असे व इतर अनेक विकासकामे यांची माहिती दिली तसेच २०२९ साठी आमदारांनी त्यांचे असलेले व्हिजन सुध्दा सांगितले .
यावेळी असंख्य चाहते, नागरिक असा प्रचंड जनसमुदाय यावेळी उपस्थित होता, या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, आमदार कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, सर्व पक्षीय पदाधिकारी, मा. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, सरपंच, सदस्य, कार्यकर्ते असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment