Friday, 27 October 2023

पिंपरीहाट पंचायत कर्मचारी यांचेवर अन्याय... बेमुदत उपोषणाचा इशारा !!

पिंपरीहाट पंचायत कर्मचारी यांचेवर अन्याय... बेमुदत उपोषणाचा इशारा !! 

भडगाव, प्रतिनिधी.. तालुक्यातील पिंपरी हाट गावाचे पाणीपुरवठा कर्मचारी रविंद्र पाटील हे कायम कर्मचारी असून गेली कित्येक वर्ष गावाला चोख सेवा देत होते. तीन महिन्यापूर्वी त्यांच्या मुलाचा व काही लोकांत वाद झाल्याने, त्यांच्या मुलावर कारवाई न करता ग्रामपंचायत कर्मचारी यांना रविंद्र पाटील यांना कामावरून कमी केले. त्यातून त्यांना घरी ठेवण्यात आले. या संदर्भात प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी तोंडी तसेच लेखी विनवणी करत प्रयत्न केले. या नंतर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्यसचिव कॉम्रेड अमृत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष शिवशंकर महाजन यांनी मध्यस्थी करून बैठक घेतली, ही बैठकीत त्यांना कामावर घेण्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय होऊन.. त्यावेळी त्यांना घेण्याचे आश्वासन दिले.. प्रत्यक्षात त्यांना कामावर घेतले नाही हा अन्याय आहे. म्हणून शेवटी येत्या नऊ नोव्हेंबर रोजी श्री पाटील व त्यांची पत्नी ग्रामपंचायत समोर उपोषण करून न्यायासाठी लढा देणार आहेत.. 

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...