Friday, 27 October 2023

पैसे नसल्याने पाण्यात बुडालेल्या अल्पवयीन तरुणावर उपचार करण्यास रुग्णालयाचा नकार, तब्बल पाच तास रुग्णवाहिकेतून फरफट ?

पैसे नसल्याने पाण्यात बुडालेल्या अल्पवयीन तरुणावर उपचार करण्यास रुग्णालयाचा नकार, तब्बल पाच तास रुग्णवाहिकेतून फरफट ?

कल्याण, (संजय कांबळे) : नवरात्र उत्सवात देवीचे विसर्जन करताना पाण्यात बुडालेल्या एका अल्पवयीन तरुणाला इतरांनी तर माणुसकी म्हणून वाचविले परंतु त्याच्या वर पुढील उपचार करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून कल्याण पुर्वेतील एका रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला आणि मुंबई येथील केईएम सरकार रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले, परंतु तेथेही बेड उपलब्ध नाही असे उतर मिळाल्याने पुन्हा या तरुणाला उल्हासनगर येथील खेमाणी रोड परिसरातील रुग्णालयात आणण्यात आले, पण दुर्दैवाने येथेही त्याच्या वर उपचार झाले नाहीत, अखेरीस शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने या तरुणावर उपचार सुरू झाले आहेत, त्यामुळे तब्बल ५ तास  मुंबई उल्हासनगर अशी फरफट या तरुणांची झाली, यामुळे उपचार नाकारणा-या या रुग्णालयावर कारवाई होणार का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

कल्याण पुर्व नेवाळी येथे राहणारा कमल चौहान हा अल्पवयीन तरुण दुर्गा देवी विसर्जन करण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला, त्याचा आरडाओरडा पाहून इतरांनी त्याला वाचविला, परंतु त्याच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्याला पुढील उपचार मिळणे आवश्यक होते, त्यामुळे त्याला कल्याण पुर्व येथील जन कल्याण रुग्णालयात  नेले, मात्र पैसे नसल्याचे रुग्णालयाच्या लक्षात येताच, त्यांनी याला रुग्णवाहिकेतून मुंबई येथील केईएम सरकारी रुग्णालयात पाठवले, परंतु तेथेही बेड नाही असे उत्तर मिळाल्याने अखेरीस पुन्हा याला उल्हासनगर येथे खेमाणी परिसरात आणण्यात आले, पण येथेही उपचार करण्यास नकार दिल्याने या तरुणाची प्रकृती चिंताजनक बनली, हे बघून येथील गणेश म्हात्रे यांनी मी पैसे भरतो पण या तरुणावर उपचार करा असे सांगितले. पण तरीही रुग्णालयाने नकार दिला. त्यामुळे त्यांने ही घटना महेश गायकवाड यांना सांगितली.

अखेर ही बाब शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या लक्षात येताच, त्यांच्या पुढाकाराने शेवटी या तरुणावर उपचार सुरू झाले आहेत, केवळ पैसे नसल्यामुळे या तरुणाची मुंबई कल्याण, उल्हासनगर अशी तब्बल ५ तास फरफट उपचाराविना झाली.

दरम्यान राज्यातील ट्रिबल इंजिन सरकार तसेच केंद्र सरकारने घोषणांचा पाऊस पाडला, राजीव गांधी, महात्मा फुले जन आरोग्य, आणि आता आयुष्यमान पण खरेच याचा गोरगरिबांना लाभ होतो का? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी रुग्णालयात उपचार मोफत केले, मात्र, या रुग्णालयात डॉक्टर, व इतर वैद्यकीय अधिकारी आहेत, पुरेसा औषध साठा, बेड आहेत का? याचा विचार कोण करणार?वेळीच महेश गायकवाड हे मदतीला धावले नसते तर कमल चौहान याचा उपचाराविना जीव गेला असता, याला कोण कारणीभूत? कळवा ठाणे, बीड, नाशिक, येथील रुग्णांच्या मृत्यूनंतर तरी आरोग्य विभागाने काय बोध घेतला हे कळेनासे झाले आहे, त्यामुळे खेदाने म्हणावे लागते, कुठे नेऊन ठेवलाय आरोग्य विभाग !

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...