Wednesday, 1 November 2023

श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ- निवोशी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मुबंईत मोठ्या उत्साहात संपन्न !!

श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ- निवोशी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मुबंईत मोठ्या उत्साहात संपन्न !!
मुंबई, उदय दणदणे :

गुहागर तालुक्यातील निवोशी येथील सामाजिक/शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ (निवोशी) या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रविवार, दिनांक-२९ ऑक्टोबर-२०२३ रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली- मुबंई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संस्थेचे प्रथम अध्यक्ष पद भूषविलेले निवोशी गावचे जेष्ठ कार्यकर्ते धाकटु होरंबे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून सदर कार्यक्रम आणि सभेला सुरुवात करण्यात आली.तद्नंतर संस्थेचे सचिव सुरेश होरंबे यांनी सन-२०२२-२३ चे कार्यअहवाल वाचन केले, तर संस्थेचे पदाधिकारी नारायण अवेरे, दिलीप होरंबे, मोहन धावडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष दत्तात्रय होरंबे यांनी संस्थेची उद्दिष्टे, गावातील मुलांची शैक्षणिक प्रगती, भविष्यातील संस्थेची वाटचाल, विविध शैक्षणिक योजना, या विषयी आपल्या मनोगतातून प्रभावीपणे मौलिक मार्गदर्शन केले. अनेक विषयांवर आत्मचिंतन होत खेळीमेळीच्या वातावरणात, दोन सत्रात पार पडलेल्या ह्या सभेला मुंबईस्थित बहुसंख्य कार्यकर्ते/ पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते, संस्थेचे सचीव सुरेश होरंबे यांनी उपस्थितांचे आभार मानत सभेची सांगता केली.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...