Friday, 24 November 2023

मोहने येथील संविधान गौरव रॅली आणि सभेसाठी जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे उपस्थित राहणार !!

मोहने येथील संविधान गौरव रॅली आणि सभेसाठी जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे उपस्थित राहणार !!

*जागतिक कीर्तीचे संविधानाचे अभ्यासक प्रा. अविनाश कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभणार*

कल्याण, संदीप शेंडगे : नालंदा बुद्ध विहार समिती आयोजित केलेल्या भव्य संविधान रॅली आणि सभेसाठी "जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे" उपस्थित राहणार आहेत.

रविवार २६ नोव्हेंबर रोजी मोहने येथील नालंदा बुद्ध विहार समितीच्या प्रशस्त हॉलमध्ये संविधान रॅली आणि संविधान सभेचे आयोजन नालंदा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष विश्वनाथ जाधव, जनरल सेक्रेटरी बी. एफ. वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा शहराध्यक्ष दिनेश जाधव यांनी केले आहे.
*भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर* यांनी देश विदेशातील अनेक राज्यघटनांचा अभ्यास करून भारत देशाला सुंदर हस्त लिखित अशी भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1950 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, सरदार वल्लभ पटेल यांच्या हस्ते देशाला बहाल केली होती आज देशाला 75 वर्ष पूर्ण होत असून आजही भारत देश पूर्णपणे अखंड आहे तसेच संपूर्ण देशात हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध इतर सर्व भारतीय नागरिक गुणा गोविंदाने नांदत आहेत, त्याचे संपूर्ण श्रेय *भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना* जाते. बाबासाहेबांबद्दल नितांत आदर व प्रेम तसेच भारतीय राज्यघटनेचा सन्मान करण्यासाठी
गेल्या अनेक वर्षापासून मोहने येथे भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात येत असून संविधानाची प्रतिकृतीची संपूर्ण मोहने परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात येते.

जेतवन नगर येथून या भव्य रॅलीला सुरुवात होऊन मोहोने येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन व पुष्पहार अर्पण करून या रॅलीचे नालंदा बुद्ध विहार समितीच्या प्रशस्त हॉलमध्ये सभेत रूपांतर होते.

या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी संविधानाचे नागरिकांना महत्त्व पटवून देण्यासाठी जागतिक कीर्तीचे देश विदेशात ज्यांचे संविधानावर लेक्चर आयोजित करण्यात येतात असे 'प्राध्यापक अविनाश कोल्हे' त्याचप्रमाणे शिक्षण आरोग्य रोजगार शेती महिला सक्षमीकरण संघटन या क्षेत्रात भरीव योगदान देणारे लाखो युवकांना यूपीएससी, एमपीएससी चे मोफत प्रशिक्षण देणारे, शहरी तसेच ग्रामीण भागातील मुलांना सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देणारे, ज्यांचे शाळा, कॉलेज, महाविद्यालय, दवाखाने मोफत आहेत असे थोर समाजसेवक सभेला संबोधित करणार आहेत.

या सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मोहने शहर अध्यक्ष माजी सभापती नगरसेवक महेंद्र गायकवाड, माजी नगरसेविका शितल महेंद्र गायकवाड, आरपीआयचे कल्याण शहर उपाध्यक्ष संदीप बाबा जाधव, जिजाऊ संस्थेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अजित जाधव, जिजाऊ संस्थेचे प्रदेश प्रवक्ते सुजय जाधव, जिजाऊ संस्थेचे कल्याण शहर समन्वय संदीप शेंडगे उपस्थित राहणार आहेत.

या रॅलीमध्ये तसेच सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे, मधुर भोजनाचा आस्वाद घेण्याचे आवाहन नालंदा बुद्ध विहार समितीचे 'अध्यक्ष विश्वनाथ जाधव' 'सेक्रेटरी बीएफ वाघमारे' यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...