Friday, 24 November 2023

ज्येष्ठ साहित्यिक, कोकण सुपुत्र अशोक लोटणकर यांना कादवा शिवार प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय मायबाप काव्य पुरस्कार !!

ज्येष्ठ साहित्यिक, कोकण सुपुत्र अशोक लोटणकर यांना कादवा शिवार प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय  मायबाप काव्य पुरस्कार !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            ज्येष्ठ साहित्यिक, कवी, कोकण सुपुत्र श्री.अशोक लोटणकर यांना अलिकडेच कादवा शिवार प्रतिष्ठान, नाशिक च्या राज्यस्तरीय मायबाप काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना प्राचार्य डाॕ.यशवंत पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रूपये ११,०००/- (अकरा हजार), सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.यावेळी प्राचार्य डाॕ. विलास देशमुख , डाॕ. सुनील ढिकले, कवी प्रकाश होळकर, प्रतिष्ठानचे प्रमुख विजयकुमार मिठे, कवी राजेंद्र उगले, रवींद्र मालुंजकर इ. मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार त्यांच्या "अक्षरनामा" या काव्य संग्रहाला प्राप्त झाला असून या काव्य संग्रहाला मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे.

            अशोक लोटणकर यांची कथा, कविता, ललित गद्य, बाल वाङमय, ब्रेल लिपी इ. २० पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांना मानाचे साहित्य पुरस्कारही लाभलेले आहेत. अलिकडेच त्यांना कोकण साहित्य रत्न पुरस्काराने आणि दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठानच्या साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते. लोटणकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा या गावचे असून ते ७ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले आहेत. लोटणकर हे बेस्टचे सेवा निवृत्त आगार व्यवस्थापक आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्कार बद्दल त्यांना अनेकांनी अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...