Thursday, 23 November 2023

रसिकांच्या मनाचा वेध घेणारा लेखक-दिग्दर्शक संदिप कानसे यांचा १७५ व्या विक्रमी प्रयोगाकडे वाटचाल !

रसिकांच्या मनाचा वेध घेणारा लेखक-दिग्दर्शक संदिप कानसे यांचा १७५ व्या विक्रमी प्रयोगाकडे वाटचाल !

निवोशी/गुहागर : उदय दणदणे

कोकणात अनेक  गाव कुशीत पिढ्यानपिढ्या जोपासलेली "नमन लोककला" आज मनोरंजन सह जनप्रबोधनाचे मुख्य माध्यम ठरत असून अनेक गाव मंडळ, नमन कलापथक, निर्माते, आयोजक नमन लोककलेचं जतन संवर्धन व्हावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.

नमन लोककला क्षेत्रात नावलौकिक असलेलं व्यक्तिमत्त्व रत्नागिरी जिल्ह्यातील, गुहागर तालुका सुपुत्र -संदिप धोंडू कानसे यांच्या लेखन, दिग्दर्शनास २५ वर्ष पूर्ण होत असून गेल्या पंचवीस वर्षांत "साई श्रद्धा कलापथक" (कानसे ग्रुप) संस्थापक तसेच लेखक, दिग्दर्शक, निर्माते- संदिप कानसे यांनी मुंबई रंगमंचावर तसेच संपूर्ण कोकणात "१७४ नमन  लोककलेचे" यशस्वी प्रयोग करून "१७५ वा भाग्यशाली" प्रयोगाकडे वाटचाल करत असून सोमवार दिनांक-०४ डिसेंबर २०२३ रोजी  मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले-पूर्व, मुंबई येथे हा खास गौरवशाली सोहळा रंगणार असून रात्रौ ०८-३० वाजता, तरुण मित्र मंडळ-चिखली (कानसेवाडी) निर्मित, साई श्रद्धा कलापथक, कानसे ग्रुप मुंबई यांचे रसिक मनोरंजनार्थ "नमन लोककला" कार्यक्रम : गण, गौळण सह संदिप कानसे लिखीत/ दिग्दर्शित ज्वलंत सामाजिक नाट्यकलाकृती "क्रांती" हा  "१७५ वा" भाग्यशाली प्रयोग सादरीकरण होईल, रसिकांना तसेच मान्यवर यांना संपूर्ण "सोहळा" कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या पासेस अथवा तिकिटावर सायंकाळी ०५ वा. प्रवेश मिळेल, तरी तमाम लोककला प्रेमी, रसिक मायबाप, हितचिंतक यांनी ह्या आनंद सोहळ्यात बहुसंख्येने उपस्थितीत राहावे, अधिक माहितीसाठी प्रयोग संपर्क : संदिप कानसे- ९५९४६२७३३४ तिकीट संपर्क : अमोल भातडे - ९०८२३९७८०६ सुभाष बांबरकर - ९८९२३८४४७१  यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन "साई श्रद्धा कला पथक" कानसे ग्रुपचे संस्थापक - संदिप कानसे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...