Thursday, 23 November 2023

माजी कुलगुरू अशोक प्रधान सर (वय - ८४ वर्षे) यांचे घडलेल्या घटनेसंदर्भात स्पष्टिकरण !!

माजी कुलगुरू अशोक प्रधान सर (वय - ८४ वर्षे) यांचे घडलेल्या घटनेसंदर्भात स्पष्टिकरण !!

कल्याण, प्रतिनिधी, दि. २३ नोव्हेंबर : तीन दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू अशोक प्रधान सर (वय - ८४ वर्षे) यांच्या वर कल्याण येथे त्यांच्या राहत्या घरी जिवघेणा हल्ला करण्यात आला होता, अशी बातमी प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाली, या संदर्भात होणाऱ्या चर्चा व चौकशी यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

त्यावेळी माजी कुलगुरू अशोक प्रधान सर यांनी सांगितले तीन दिवसांपूर्वी छत्रपती शिक्षण संस्थेतील बडतर्फ शिक्षक संजय जाधव यांनी माझ्या घरी येऊन आपली आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून आपण मला नोकरीवर परत घेण्याकरिता संबंधित शिक्षण संस्थेला सांगावे, असे सांगितले असता मी २०१६ सालीच निवृत्त झालो असून मी आपणास काही मदत करू शकत नाही, असे सांगितले त्यावेळी त्यांनी व त्यांच्या सोबत आलेल्या सहकाऱ्यांनी तोंडावर स्प्रे मारुन दोरीने बांधून चाकू व नकली रिव्हॉल्व्हरचा‌ धाक दाखविला.

संजय जाधव यांचे छत्रपती शिक्षण संस्थेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्या संदर्भात बोलण्यास नकार दिला व त्यांच्या घरी घडलेल्या घटनेची तक्रार पोलिसांकडे केली असून पोलिस योग्य रीतीने तपास करीत आहेत असे अशोक प्रधान सर यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय व सर्व माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...