कल्याण नगर महामार्ग धुक्यात न्हाऊन निघाला, गावखेडी गायब, अपघातांची शक्यता ?
कल्याण, (संजय कांबळे) : अवकाळी पाऊस, महागाई, नुकसानीची वेळेवर न मिळणारी भरपाई, वाढते धुळवडिचे प्रदूषण आणि आता धुकं, यामुळे शेतकरी, नागरिक,जनता हैराण झाली असून या धुक्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे.
कल्याण नगर महामार्गावर म्हारळ, वरप, कांबा येथे मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे, रस्त्याचे काम अद्याप पुर्ण न झाल्याने रस्त्यावर रोज येजा करताना 'धुळवड, खेळली जात आहे. मागील आठवड्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला, यामध्ये भात, पेंडा, व इतर साहित्याचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच महागाई पाट सोडेना झाली आहे. मंत्र्यांच्या मदतीच्या वल्गना पावसाच्या पाण्यावर वाहून गेल्या आहेत, मागील पावसाने झालेली नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही, अशातच आता कल्याण नगर मार्ग धुक्यात न्हाऊन निघत आहे, या मार्गावर इतके धुकं आहे की समोरचे काही दिसतच नाही, यामुळे म्हारळ, वरप, कांबा येथे अपघाताची संख्या वाढली आहेच, तसेच कल्याण बदलापूर रस्त्यावर वाहोली,कुंभारपाडा, मांजर्ली, बांधणेपाडा, येथे आयवा, टँकर, टेम्पो, कार, यांचे अपघात झाले, तर कल्याण, मुरबाड, टोकावडे, माळशेज घाट, आदी ठिकाणी विविध रस्ते अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
मुरबाड, कर्जत, माळशेज घाट या परिसरात धुकं इतके दाट आहे की डोंगर द-यातील गावे दिसेनासे झाली आहेत. या ठिकाणी सुर्यदर्शन दुपारी होत आहे. धुक्यामुळे थंडी देखील जाणवू लागली आहे, गाड्या चालवताना वाहनचालकांनी काळजी घ्यावी असे अवाहन केले जात आहे.
No comments:
Post a Comment