Monday, 4 December 2023

सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; '१३२ रक्तदात्यां'नी रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी !!

सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; '१३२ रक्तदात्यां'नी रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी !!

मुंबई - ( दिपक कारकर )

पुणे शहरातील अनेक क्षेत्रात तसेच समाजपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या उपरोक्त संस्थेच्या वतीने रविवार दि.३ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण १३२ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक समाजहिताचे काम केले. या रक्तदान शिबिरामध्ये संघटनेचे सर्व महाराष्ट्र प्रांत पदाधिकारी, पुणे शहर पदाधिकारी, सर्व विभाग आणि पुणे शहर महिला आघाडी मोट्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी कोथरूड विभागाचे सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, इतर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून करण्यात आली. शेवटी सर्वांच्या मनोगताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. पुणे शहरात रक्त पुरवठा सातत्याने कमी होताना, त्यास अनुकरण सहयाद्री कुणबी संघ, हि संस्था नेहमीच ह्यात योगदान देण्यास सक्रिय असते. संस्थेच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...