गिरगाव मध्ये नमनाचे सलग दोन प्रयोग ; श्री अशोक दुदम "लोकनाट्य नमन" होणार सादर !
मुंबई - ( दिपक कारकर )
महाराष्ट्र अनेक लोककलेने सजलेला आहे.महाराष्ट्राच्या कोकण प्रांतात अनेक प्रकारच्या लोककला साजऱ्या केल्या जातात. नमन ( खेळे ), शक्ती तुरा (जाखडी नृत्य), भजन, भारुड, तमाशा, डफावरील पोवाडे इ. लोककलांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वाधिक नमन ( खेळे) हा लोककला प्रकार कोकणात लोकप्रिय आहे.
अशा कोकणच्या अनेक भूमिपुत्रांनी आपल्या-आपल्या परीने ह्या लोककलांचे जतन - संवर्धन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नमन लोककला सर्वत्रित सादर होताना दिसते. संगमेश्वर तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या "गोळवली" गावचे भूमिपुत्र उत्तुंग कलाप्रेमी अशोक दुदम यांनी अनेक वर्षे नमन लोककला जपत मुंबई रंगभूमीवर तीचे अनेक विक्रमी प्रयोग केले आहेत. जिल्ह्यात अनेक गावी त्यांची शिष्य मंडळी निर्माण केली आहे.नमन कलेत गावचे कलाकार आणि परिचयातून ३५ हून अधिक गावे जोडलेल्या दुदमांनी हा गोतावळा निर्माण करत आजवर हे यश प्राप्त केलं आहे. कवी/गायक/निर्माते अशोक दुदम यांचे लोकनाट्य नमन म्हणजे अफाट प्रेक्षक गर्दी, आणि सादरीकरणात पुरुष पात्र बाज ठेवत श्रवणीय गीतरचना, मोहून टाकणारी नृत्ये, विनोदी व सामाजिक संदेश देणारी नाट्यकृती हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
नमन कलेत अभिनव प्रयोग करणारे श्री अशोक दुदम लोकनाट्य नमन एकच दिवशी दोन प्रयोग करण्यासाठी सज्ज झाले आहे. ह्या दैदिप्यमान नाट्यकृतीचा सोहळा रविवार दि.०७ जानेवारी २०२४ रोजी पहिला प्रयोग वेळ दुपारी ३ : ०० वा. तर दुसरा प्रयोग रात्रौ ०७ : ०० वा. मुंबईतील सुप्रसिद्ध साहित्य संघ मंदिर, गिरगाव, चर्नी रोड ( मुंबई ) येथे पार पडणार आहे. दरम्यान "जागर" - "संबळ हि वाजणारच" कलाकृती सादर होणार आहे. ह्या कलाकृतीचे लेखन/दिग्दर्शन रूपेश दुदम यांनी केलं आहे.
No comments:
Post a Comment