जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारातील महिलांसाठी मोफत प्रशिक्षण उदघाटन....
*संस्थापक / अध्यक्ष निलेश (आप्पा) सांबरे साहेबांच्या शुभहस्ते उध्दघाटन....*
नालासोपारा, प्रतिनिधी : महिला फक्त चुल, मुल,घर या चौकटीत न राहता तीच्या कलागुणांना वाव मिळावा
महिलांच्या हाताला काम मिळणे गरजेचे आहे त्यांना घरबसल्या चार पैसे कमावता यावे या हेतूने महिलांसाठी मोफत शिवण (टेलरींग) प्रशिक्षण, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, मेहंदी प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे.
सोमवार दिनांक ०१\०१\२०२४ दुपारी २ वाजता दत्त मंदीर समेळपाडा नालासोपारा पश्चिम येथे प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन *जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. निलेश (आप्पा) सांबरे* यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व संस्थेचे अध्यक्ष मा. निलेश (आप्पा) सांबरे हे आज ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व सामान्य महिला, पुरुष, कामगार, शेतकरी, विद्यार्थी या सर्वांचा आधार बनले आहेत, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, स्वयंरोजगार, नैसर्गिक क्षेत्रात यांचे मोठे योगदान आहे, आजवर कोणाही आमदार, खासदार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींपेक्षा यांचे खूप जास्त योगदान आहे.
अध्यक्ष निलेश (आप्पा) सांबरे यांची सामाजिक क्षेत्रातील तळमळ व विचार यामुळे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेसोबत अनेक जण जोडले गेले आहेत, अशाच नालासोपारा येथील सौ. रुचिता अमित नाईक
महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी यातुन शाश्वत उपजीविका निर्माण व्हावी यासाठी रूचिता नाईक नेहमी मदत करत असतात रूचिता नाईक यांच्या स्वखर्चातुन पाच शिलाई मशिन महिलांना प्रशिक्षणासाठी देण्यात आल्या...
निमंत्रक
*सौ.रूचिता अमित नाईक*
*9325760393*
No comments:
Post a Comment