अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या २३ वा दिवस ; अजून तोडगा नाही !
*ग्रामीण विकास मंत्र्यांच्या घरावर जामनेरला मोर्चाचा इशारा*
जळगाव, प्रतिनिधी.. गेल्या २२ दिवसापासून महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस या आपल्या मागण्यांसाठी ४ डिसेंबर २३ पासून बेमुदत संपावर आहेत.
त्यांच्या मागण्यांच्या पाठपुरावासाठी १५ डिसेंबर २३ रोजी लगोलग १८ डिसेंबर २३ रोजी तर्फ विराट मोर्चा नागपूर विधानसभेवर गेला त त्यांनी दुपार रात्री ९ वाजेपर्यंत मुक्कामी आंदोलन केले. त्याची दखल महाराष्ट्र सरकारने व मीडियाने घेतली म्हणून २० डिसेंबर रोजी सरकारने मीटिंग बोलावलेली मीटिंग तहकुब केली. त्यातच नागपूर विधानसभेचे अधिवेशन संपले व सर्व बाड बीस्तरा घेऊन सरकार मुंबईकडे परतले आहे.
पण अधिवेशन काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संप प्रश्नी तोडगा निघालेला नाही.. म्हणून जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ (एमए पाटील) यांच्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने २६ डिसेंबर रोजी शमा प्रसाद मुखर्जी उद्यान ते जळगाव जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढला मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते काँ अमृत महाजन, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्ष प्रेम लता पाटील, अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक कॉम्रेड भानुदास पाटील, जिल्हाध्यक्ष सुषमाजी चव्हाण यांनी केले. संपाच्या मुख्य सहा मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे सिओ श्री अंकित यांना कृती समितीच्या शिष्टमंडळाने सादर केले, शिष्टमंडळात सर्व श्रीमती ममता महाजन, विद्या अशोक पाटील, प्रमिला पाटील, वत्सला पाटील, लता ठाकरे, कल्पना सुरडकर, ललिता भिल आदींचा समावेश होता.. जिल्हा परिषदेत अंगणवाड्यांना दिला जाणारा निकृष्ट खाऊ याबाबत चर्चा झाली व संबंधित ठेकेदारावर कारवाई करायची मागणी करण्यात आली याचे बरोबर मूळ मागण्या अंगणवाडी सेविकांना २६ हजार रुपये पगार द्यावा, मदतनिसांना अठरा हजार रुपये पगार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतीचा दरमहा पेन्शन मिळावे.
अंगणवाडीतील बालकांच्या खाऊचे दर २५ रुपये करण्यात यावा आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली चर्चेअंती मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी महाराष्ट्र शासनाकडे आपल्या सर्व मागण्यांचे निवेदन पाठवतो. अशा तऱ्हेचे आश्वासन दिले.
* ग्रामीण विकास मंत्र्यांच्या निषेध __
*या मोर्चा चे धरणे आंदोलनात गेल्या नागपूर विधानसभा अधिवेशनात महिला बालकल्याण मंत्री यांनी चर्चेला उत्तर न देता ग्रामीण विकास मंत्रीच गिरीश महाजन यांनी हक्क भंग करून चुकीचे उत्तर देत होते आणि महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठी चीड व असंतोष पसरला आहे. त्या अनुषंगाने त्यांचा निषेध करण्यात आला.. व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतल्यास ग्रामीण विकास मंत्री यांच्या घरावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा जामनेर येथे नेण्यात येईल असा इशारा मोर्चा देण्यात आला*. तसेच जेलभरो आंदोलनचा इशारा सरकारला देण्यात आला आहे
बालकांचे तसेच लाभार्थी यांचे नुकसान टाळण्याबरोबर बरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पगार वाढ, पेन्शन, सेवानिवृत्ती रक्कमा तसेच त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यतेसाठी मे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून हा संप मिटवावा असे आवाहन नेत्यांनी मार्गदर्शन करताना केले आहे मोर्चाचे निवेदन जिल्हा परिषदेचे कार्य पालन अधिकारी श्री देवेंद्र राऊत यांनी देण्यात आले.
No comments:
Post a Comment