ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे विक्री प्रदर्शनाकडे नागरिकांची पाठ, पस्तीस लाखांच्या तरतुदीचे प्रोत्साहान ठेकेदारासाठी ?
कल्याण, (संजय कांबळे) : दिव्यांग व्यक्ती अथवा अपंगांच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे आयोजन ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधी करण्यात आले आहे. परंतु याचे आयोजन दिवाळीत न करता ऐन सुट्टीच्या वेळेत केल्याने या प्रदर्शनाकडे अक्षरशः नागरिकांनी पाठ फिरवली असून शेवटच्या दिवसापर्यंत या स्टाँलवर केवळ १०० ते दिडशे रुपयांची वस्तू विक्री झाल्याने या कार्यक्रमासाठी तब्बल ३५ लाखांची तरतूद नक्की दिव्यांगासाठी? की ठेकेदार निखील शहा याच्या साठी? या बाबत प्रश्न निर्माण झाला आहे. तर ऐवढे पैसे दिव्यांगाना दिले तर त्यांचे भलेतरी होईल असा घणाघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित दिव्यांंग व्यक्त अथवा अपंगांच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले, २२ ते २६ डिसेंबर असे ५ दिवस हे प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये दिव्यांगाच्या जवळपास १८ संस्था व शाळा यांनी आपले स्टाँल मांडले होते. या प्रदर्शना मागील उद्देश होता की, दिव्यांगाना प्रोत्साहन व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यावेळी यातील सहभागी व्यक्तींना चहा, नास्ता व भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व कार्यक्रमासाठी तब्बल ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तसे पाहिले तर सन २०२३/२४ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या सेसफंड अंतर्गत ५ टक्के दिव्यांगाच्या कल्याणासाठी सुमारे ४२३ लक्ष रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे यामधून एकूण १५ योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा ३५ लाख, दिव्यांगाना स्वयंमरोजगार व प्रोत्साहन २५ लाख, प्रचार व प्रसिद्धी ६५ लक्ष, गणवेश व साहित्य ५० लक्ष, विक्री केंद्र ३५ लक्ष, तीन चाकी खरेदी अनुदान ५० लक्ष, प्रोत्साहन अनुदान ५ लाख रुपये, दिव्यांग योजना १५ लक्ष, कौशल्य विकास वर्ग १० लक्ष, शाळांना सोईसुविधा ५० लक्ष, आँनलाईन यंत्रणा ३ लक्ष, मंमिमंद मुलासाठी आरोग्य विमा १० लक्ष, डिजिटल क्लास रुम ३० लक्ष, माझी लेख २५ लक्ष, आणि अखेरीस राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरावर विशेष प्राविण्य विजेत्यांना विविध पुरस्कार देणे करिता ५ लाख रुपये असे एकूण सुमारे ४२३ लक्ष इतक्या मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
यापैकी ३५ लाख रुपयांची तरतूद असलेले दिव्यांगानी अथवा अपंग संस्थांनी बनविलेल्या वस्तू विक्री व प्रदर्शन सध्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सुरू आहे, याचा ठेका निखिल शहा, या एका जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीने घेतला आहे, वास्तविक पाहता हे प्रदर्शन दिवाळीच्या काळात घ्यायला हवे होते, मात्र ते नेमकं नाताळच्या सलग सुट्टीच्या वेळी घेण्यात आले, याचा परिणाम असा झाला की, या प्रदर्शनाकडे दिव्यांग बांधव व नागरिकांनी अक्षरशः पाठ फिरवली आहे, ५/७ गुंटे मैदानावर उभारण्यात आलेल्या मंडपात पुर्णपणे शुकशुकाट दिसून येत आहे. या प्रदर्शनास प्रत्यक्ष भेट दिली असता धक्कादायक चित्र समोर आले, काही स्टाँल धारक झोपले होते, प्रदर्शनास नागरिक नसल्यामुळे गेल्या ४ दिवसांत केवळ १००/१५० रुपयांची विक्री झाल्याचे स्टाँल धारकांनी सांगितले, तर हे प्रदर्शन चुकीचे दिवसांत घेतले, आंम्हाला अचानक सांगितले, त्यामुळे जे मिळेल त्या वस्तू घेऊन इथे आलो, आमची पंचायत झाली. पण आम्ही बोलू शकत नाही, असे सांगितले, याहीपेक्षा आश्चर्य व गमतीशीर बाब म्हणजे, वरीष्ठ अधिकां-यांना वस्तूंंची खरेदी झाली आहे हे दाखविण्यासाठी आम्ही एकमेकांच्या स्टाँल वरील वस्तू खरेदी केल्या असे एका महिला स्टाँल धारकांनी सांगितले. यावरून हे प्रदर्शन नक्की कोणासाठी? हा प्रश्न उपस्थित होतो,
याहून दुर्दैवाची बाब म्हणजे या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर सीईओ सह कोणीही वरीष्ठ अधिकारी येथे उपस्थित नव्हते, केवळ जिल्हा समाज कल्याण प्रभारी अधिकारी संजय बागुल हे काही तासापुरते हजेरी लावून जात होते, ४ दिवसात जेमतेम १०० ते २०० लोकांनी जेवण केले असेल, परंतु ठेकेदार मात्र रोज २०० लोक जेवतात असा दावा करतो हे मोठे धाडसाचे वाटते.
एकूणच येथील सहभागी संस्था, शाळा, उभारण्यात आलेला मंडप आणि असलेला शुकशुकाट पाहता जेमतेम या ५ दिवसात ५ ते १० लाख रुपये खर्च देखील शक्य वाटत नसताना तब्बल ३५ लाख रुपये कोणासाठी? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, तर ठेकेदार निखिल शहा हा खालपासून वरपर्यंत सर्वांना 'आर्थिक, प्रोत्साहन देतो, अशी खाजगीत चर्चा ऐकायला मिळत होती. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा यामधील कागदोपत्री उद्देश दिव्यांगाना प्रोत्साहन व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा असला तरी प्रत्यक्षात मात्र ठेकेदाराला भरमसाठ'आर्थिक, प्रोत्साहन मिळेल ऐवढे मात्र शंभर टक्के खरे आहे.
प्रतिक्रिया --
*श्री अंबादास दानवे (विधानपरिषद, विरोधी पक्षनेते) __
-हा दिव्यांगाचा अपमान आहे, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात असा सावळा गोंधळ सुरू आहे, ऐवढे पैसे दिव्यांग बांधवांना दिले असते तर त्यांचे भले तरी झाले असते, याचा जाब विचारण्यात येईल.
*श्री मनूज जिंदल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिप ठाणे) __
-या संदर्भात मला काही माहिती नाही, समाजकल्याण अधिका-याला विचारा.
No comments:
Post a Comment