उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेची वरप येथे जोरदार तयारी सुरू, हजोरोची उपस्थिती राहणार !!
कल्याण, (संजय कांबळे) : राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे कल्याण तालुक्यातील वरपगाव येथे कार्यकर्ते मेळ्यासाठी उपस्थित राहणार आहे, संपूर्ण ठाणे जिल्ह्यासह इतरही ठिकाण्यावरुन हजोरोंंच्या लोक या सभेसाठी येतील असे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भाऊ गोंधळे यांनी सांगितले .सध्या वरप येथे याची जोरदार तयारी सुरू आहे.
शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे व त्यांच्या इतर सहकारी आमदारांनी फुटून वेगळा गट स्थापन करून भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. यानंतर महाराष्ट्रात त्यांच्या वर गद्दारी केल्याचा ठपका ठेवून पन्नास खोके एकदम ओके, अशा घोषणाबाजी ने वातावरण ढवळून निघाले होते, हे शांत होते न होते तोपर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवारांनी बाहेर पडून भाजपाला जवळ केले, इतकेच नव्हे तर सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे त्यांच्या वर देखील मोठ्या प्रमाणात टिका झाली. पक्षातील ७० ते ८० टक्के, आमदार व कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचे त्यांनी विविध सभामधून सांगितले होते.
त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून येत्या ७ जानेवारी २०२४ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे कल्याण तालुक्यातील वरप गाव येथे आयोजित कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, त्यांच्या बरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा, रुपालीताई चाकणकर, अमोल मिटकरी हे मेळाव्याला संबोधित करणार आहेत, तर राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव, आनंद परांजपे,यांच्या सह शेकडो पदाधिकारी, हजेरी लावणार आहे.
यासाठी वरप ग्रामपंचायत हद्दीतील डेअरी भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या भव्य मैदानावर मंडप टाकण्याचे काम सुरू असून येणाऱ्या कार्यकर्ते व नागरिक याची भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ते कल्याण तालुक्यात येत असल्याने कार्यकत्यामध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून या सभेकरिता संपूर्ण जिल्ह्यातून हजोरोंच्या संख्येने उपस्थिती लाभणार आहे असे जिल्हा अध्यक्ष भरत गोंधळे यांनी सांगितले, या सभेच्या तयारीची पहाणी आज त्यांनी केली, यावेळी त्यांच्या बरोबर गावचे पोलीस पाटील सचिन भोईर, वरप ग्रामपंचायत सदस्य, निलेश कडू, योगेश म्हसकर, उद्योजक योगेश कडू, शरद भोईर, सुभाष कुर्ले, विलास सोनावणे, राहुल गोंधळे, आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment