कोरोनाचा वाढता प्रभाव, सोमवारी राज्यात एका दिवसात २८ नवीन रुग्ण !!
प्रशासन राज्यात योग्य ती पावलं उचलत आहे - उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई , प्रतिनिधी : महाराष्ट्रात सोमवारी करोनाचा संसर्ग झाल्याची 28 नवी प्रकरणं समोर आली आहेत. याचसोबत राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 168 वर पोहोचली आहे. सर्वाधिक प्रकरणं मुंबई (77), ठाणे (29), रायगड (17) आणि पुण्यातील (23) आहेत.
राज्यात करोनाचा नवा व्हेरियंट JN.1 चा संसर्ग झालेले 10 रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण ठाण्यातील आहेत. ठाण्यात 5 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून, सर्वजण उपचारानंतर बरे झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती देताना सांगितलं की, "माझे मंत्रिमडळातील सहकारी धनंजय मुंडे यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. प्रशासन राज्यात योग्य ती पावलं उचलत असून, प्रसार रोखण्यासाठी अधिकार्यांना योग्य ते आदेश देण्यात आले आहेत"
No comments:
Post a Comment