मालाड येथे श्री दत्त जन्मोत्सव आयोजन !!
मुंबई - ( दिपक कारकर )
प्रतिवर्षी प्रमाणे मालाड ( पुर्व ) येथील ॐ नरहरी नारायण शिष्य मंडळाच्यावतीने मंगळवार दि.२६ डिसेंबर २०२३ श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे.
संस्थेचे संस्थापक कुलगुरु ॐ चैतन्य श्री नरहरी विश्वनाथजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने व मार्गदर्शनाने सकाळी ९ ते १० श्री दत्त पादुकांवर अभिषेक व पुजा सकाळी १० ते १२ श्री सत्यदत्तांची शोडषोपचार महापुजा व मंत्रपुष्पांजली नंतर आरती दुपारी १ ते रात्रौ पर्यंत माधुकरी प्रसाद (भंडारा) सायंकाळी ३ ते ८ वा.श्री. सद्गुरु पुजन व नामस्मरण आणि कुलगुरु श्री.ॐ चैतन्य नरहरी विश्वनाथजी महाराज दर्शन सोहळा सायंकाळी ७ ते रात्रौ १० वा.आरती व सुस्वर संगीत भजने असे अनेक कार्यक्रम होतील. तरी या उत्सवाला समस्त दत्तभक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन ॐ नरहरी नारायण शिष्य मंडळातर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment