Monday, 25 December 2023

नवतरुण मित्र मंडळ पोफळवणे चिनकटेवाडी (रजि.) मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आणि युवा मंचतर्फे दिनदर्शिका -२०२४ चे प्रकाशन !!

नवतरुण मित्र मंडळ पोफळवणे चिनकटेवाडी (रजि.) मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आणि युवा मंचतर्फे दिनदर्शिका -२०२४ चे प्रकाशन !!
 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
           नवतरुण मित्र मंडळ पोफळवणे चिनकटेवाडी (रजि.) मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आणि युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनदर्शिका प्रकाशन सोहळा २०२४ आणि सहकुटुंब मेळावा अध्यक्ष मा. श्री.लक्ष्मण  हरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मुलुंड विद्यामंदिर हायस्कूल येथे थाटामाटात संपन्न झाला.

           या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  कुणबी समजोन्नती संघ शाखा तालुका दापोली मा.अध्यक्ष सन्मा. श्री. शरदजी भावे, कुणबी समाज विकास संघ १८ गावं ऊन्वरे विभाग कार्याअध्यक्ष नरेश घरटकर, सचिव सुनील चव्हाण, सहसचिव शांताराम खळे,विजय बंगाल, खजिनदार संतोष हरावडे, युवक मंडळ सचिव प्रविण मनवळ, संघटक राजेंद्र विचले, गुहागरचे  वसंत आंबेकर, अनंत  नाटूस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

           सर्व मान्यवर मंडळी  विनंतीला मान देऊन कार्यक्रमात सहभागी होऊन आपला अमूल्य वेळ देऊन मंडळास शुभेच्छा, मार्गदर्शन, स्नेहभाव व्यक्त केला त्याबद्दल सर्व अतिथीचं, समाजबांधवांचे  मनःपूर्वक आभार व्यक्त करत त्यांना धन्यवाद देण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमला नवतरुण मित्र मंडळ पोफळवणे चिनकटेवाडी (रजि.) मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आणि युवा मंच यांचे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...