माऊली जेष्ठ नागरिक मंडळाच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा !!
कल्याण , सचिन बुटाला : कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपल्या आमदार विकास निधीतून त्यांच्या मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २४ चे मा. नगरसेवक व शिवसेना विधानसभा संघटक संजय पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या प्रभागातील माऊली जेष्ठ नागरिक मंडळाच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा आज आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते पार पडला.
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार विकासाचे काम करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला मिळणार प्रतिसाद हीच या सरकारच्या कामाची पोचपावती आहे. आज आम्ही आमच्या मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २४ येथील माऊली जेष्ठ नागरिक मंडळ यांच्या नुतन वास्तू करिता आमच्या आमदार विकास निधीतून फंड दिला आहे, या नूतन ईमारती मध्ये येणारा प्रत्येक जेष्ठ नागरिक आम्हाला मार्गदर्शन करतील असा विश्वास आमदार श्री विश्वनाथ भोईर साहेब यांनी व्यक्त केला.
या लोकार्पण सोहळ्यास कल्याण शहरप्रमुख श्री.रवि पाटील, विधानसभा संघटक व मा.नगरसेवक श्री.संजय पाटील, उपशहर प्रमुख मा. नगरसेवक श्री.विद्याधर भोईर, मा. नगरसेविका सौ.निलीमाताई पाटील, शाखाप्रमुख श्री.गणेश कोते, श्री. रविंद्र तायडे तसेच माऊली जेष्ठ नागरिक मंडळाचे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment