Sunday, 24 December 2023

जे. के. पाटील इंग्लिश स्कूल भोपर डोंबिवली येथे रोबोटीक फेस्टिवल संपन्न !!

जे. के. पाटील इंग्लिश स्कूल भोपर डोंबिवली येथे रोबोटीक फेस्टिवल संपन्न !!

डोंबिवली / ठाणे, प्रतिनिधी, दि. २४ - डोंबिवलीतील भोपर येथील जे. के. पाटील इंग्लिश स्कूल येथे आज रोबोटीक फेस्टिवल संपन्न झाले. या कार्यक्रमाला उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभाग शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर उपस्थित होते. सरांच्या शुभ हस्ते आज रोबोटीक फेस्टिवलची सुरवात करण्यात आली. 
     या प्रसंगी जे. के. पाटील शाळेचे चेअरमन गजानन पाटील, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे वसंत जोहरे, सतीश शिरसाट, वकील तुषार म्हात्रे आणि आदी मान्यवर उपस्थित होते.
     वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप मेहनत घेऊन रोबोटीक फेस्टिवल आयोजित केल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता आवश्यक असे महत्वपूर्ण कार्य करण्याचे काम आयोजकांनी केल्याबद्दल शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...