Saturday, 23 December 2023

शिवछत्रपती शिक्षक संघटनेची विरार व नालासोपारा शहर कार्यकारिणी जाहीर !!

शिवछत्रपती शिक्षक संघटनेची विरार व नालासोपारा शहर कार्यकारिणी जाहीर !!

*अध्यक्षपदी जितेंद्र साठे व धर्मेंद्रनाथ शुक्ला यांची नियुक्ती*

विरार/पालघर, प्रतिनिधी : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेची विरार व नालासोपारा शहर कार्यकारणी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रकांत पवार, एल.आर. अण्णासाहेब, अरुण भोईर सर, राजेंद्र पाटील सर, महेश कुडू सर यांच्या उपस्थितीत नुकतीच जाहीर करण्यात आली.

     विरार शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - जितेंद्र साठे, उपाध्यक्ष - विजय चोघळा व परेश कुडू, सचिव - कैलास देवरे, सहसचिव - विश्वजित वळवी व मंगेश गावड, कोषाध्यक्ष - काशिनाथ महाले, सल्लागार - रमाकांत घरत, कल्पना राऊत व रोशनी गावड, प्रसिद्धी प्रमुख - किरण गायकर, कार्यकारिणी सदस्य - विनोद कोरिया, निलेश गुप्ता, भरत पाटील, चंद्रकांत सोनावले व शशिकांत ठाकूर, महिला सदस्य - अर्चना मानकर, सावित्री किणी व स्वाती जयकर, तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून महेश कुडू व राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. 

     नालासोपारा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - धर्मेंद्रनाथ शुक्ला, उपाध्यक्ष - सुनील म्हात्रे व पांडुरंग कदम, सचिव - अजय सावंत, सहसचिव - श्री. वाघमारे व रमेश सिंग, सल्लागार - अरुण शेलार, माणिक दोतोंडे, अरुभ कोळेकर, महिला प्रतिनिधी - राजश्री पवार, अनिता सिंग व नम्रता घरत तर कार्यकारिणी सदस्य म्हणून उमेश शिंगडा, सुनील यादव, राकेश यादव व अभिषेक सिंग यांची नियुक्ती करण्यात आली.

     शिक्षक-शिक्षकेतरांच्या समस्यांना वाचा फोडण्याच्या उदात्त हेतुने या संघटनेत सामिल होताना वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी, संघटना विस्तार व दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याची ग्वाही सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

श्री. किरण गायकर
प्रसिद्धीप्रमुख महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना
मो.नं. 9765656180

No comments:

Post a Comment

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !!

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !! उरण मध्ये फसवणूक करून जमीन विक्री करणारी बनावट टोळी सक्रिय. सीबीडी पोलीस ठाण्यात ...