Sunday, 24 December 2023

बलसंवर्धन शिबीर २०२३ च्या शिबिरार्थींच्या बसला भगवा झेंडा दाखवून रवाना !!

बलसंवर्धन शिबीर २०२३ च्या शिबिरार्थींच्या बसला भगवा झेंडा दाखवून रवाना !!

*शिवसेना कल्याण शहर शाखा व शिवकल्याण प्रतिष्ठान, कल्याण आयोजित*

कल्याण, प्रतिनिधी, दि. २४ : डिसेंबर महिन्यातील ख्रिसमस सणानिमित्त मिळणाऱ्या सुट्टीचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने ८ ते १२ वयोगटातील मुलांसाठी शिवसेना (कल्याण शहर शाखा) व शिवकल्याण प्रतिष्ठान, कल्याण यांच्या तर्फे चार दिवसीय बालसंवर्धन शिबिराचे आयोजन राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी, मु‌. पो. कोंढाणे, ता. कर्जत, जिल्हा - रायगड येथे रविवार (२४ डिसेंबर २०२३) ते बुधवार (२७ डिसेंबर २०२३) या काळात आयोजित केले असून या शिबिरात एअरगन ने नेमबाजी, पदभ्रमण, घोडेस्वारी, पक्षी निरीक्षण, कवायत, व्हॅली क्रॉसिंग, सर्प ओळख, जंगल भ्रमंती, सायंकाळी प्रार्थना, कथाकथन, अंताक्षरी, रात्रीच्या वेळी शेकोटी सोबत धमाल अशा भरगच्च कार्यक्रमांनी शिबिराचे दिवस असतील.

शिवसेना कल्याण शहर शाखा व शिवकल्याण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आजपासून आयोजित या बलसंवर्धन शिबीर २०२३ मधील शिबिरार्थांच्या बसला भगवा झेंडा दाखवून व शिबिरार्थांना शुभेच्छा देऊन बस रवाना करण्यात आली.

शहराच्या चाकोरीबद्ध जीवन व सिमेंटच्या जंगलातून दूर ,गर्द वनराईने नटलेल्या निसर्गाचा अनुभव घेण्याची संधी आपल्या मुलांना मिळावी, त्यातून काही नविन शिकता यावे व त्यांचा आत्मविश्वास वाढावा याच साठी हा प्रयत्न...!

या बलसंवर्धन शिबीरामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास मिळतो असा विश्वास शहरप्रमुख रवी पाटील यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर शिबिर संयोजक समीर देशमुख, अनिकेत गुंजाळ, महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, उपशहरप्रमुख विद्याधर भोईर, विभाग प्रमुख संजय राजपूत, रूपेश सकपाळ, उपविभाग प्रमुख अजय हिरवे, सचिन रांजणे, सचिन अखाडे, शाखा प्रमुख प्रशांत पाटील, प्रतिक चौधरी, उपशाखा प्रमुख प्रतापराव चव्हाण, दिलिप सातारकर, विजय उबाळे, अनिकेत मरबळ, स्वपनील कदम, सुनील वाघ, युवासेना भिवंडी लोकसभा विसतारक सुचेत डामरे, कल्याण जिल्हा सचिव योगेश पाटील, उपशहरप्रमुख अनिरुद्ध पाटील, निलेश वाघमारे,प्रथमेश पाटील, साहिल चौथे, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...