Tuesday, 5 December 2023

संगमेश्वर स्थानकात गाड्यांना थांबा मिळविण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर ग्रुपचे रेल्वे राज्यमंत्री आणि कोकण रेल्वे ला निवेदन !!

संगमेश्वर स्थानकात गाड्यांना थांबा मिळविण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर ग्रुपचे रेल्वे राज्यमंत्री आणि कोकण रेल्वे ला निवेदन !!

संगमेश्वर, (शांताराम गुडेकर) :
               संगमेश्वर स्थानकात नऊ गाड्यांना थांबा मिळावा यासाठी कोकणातील समाजकार्यामध्ये काम करणाऱ्या निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपने रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांना निवेदन दिले आहे. ही मागणी मान्य झाल्यास संगमेश्वर रेल्वे स्थानकातून हजारो नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

             संगमेश्वर हा १९६ गावांचा तालुका असून पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा. या पर्यटनस्थळामध्ये मार्लेश्वर, कर्णेश्वर सप्तेश्वर ही पुरातन देवस्थाने, प्रचितगडसारखा शिवकालीन किल्ला, छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आले ते कसबा ही पुरातन पेठ, छत्रपती संभाजी महाराजांची सासरवाडी शृंगारपूर गाव,गरम पाण्याचे कुंड ही महत्त्वाची ऐतिहासिक व पर्यटन स्थळें संगमेश्वर तालुक्यात आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक श्री.गोळवलकर गुरुजी यांचे गाव व माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दत्तक घेतलेले गोळवली हे गाव, संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या स्थानकातून कोकण रेल्वेला वर्षाला करोडो रुपयांचा महसूल मिळतो व दिवसेंदिवस प्रवाश्यांची संख्या वाढतच आहे.
           नेत्रावती एक्स्प्रेस आणि अन्य गाड्या संगमेश्वर रोड स्थानकात थांबा मिळाल्यापासून आजपर्यंत प्रवाशांनी तुडुंब भरलेली असते. या अधिक नऊ गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकात थांबू लागल्यास संगमेश्वर तालुक्यातील भूमीपुत्रांना न्याय मिळेल.तसेच कोकण रेल्वेचे उत्पन्नही वाढेल. संगमेश्वर तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला त्यामुळे चालना मिळेल. आमच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जास्तीत जास्त गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकात थांबा मिळावा असे ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...