Monday 1 January 2024

कुणबी समाजोन्नत्ती संघ,मुंबई संलग्न शाखा विक्रोळी-घाटकोपर तर्फे दिनदर्शिका -२०२४ प्रकाशनसह विविध कार्यक्रम संपन्न !!

कुणबी समाजोन्नत्ती संघ,मुंबई संलग्न शाखा विक्रोळी-घाटकोपर तर्फे दिनदर्शिका -२०२४ प्रकाशनसह विविध कार्यक्रम संपन्न !!

विक्रोळी, (शांताराम गुडेकर) :
          कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई विभागीय शाखा विक्रोळी-घाटकोपर संलग्न कुणबी महिला मंडळ,कुणबी युवक मंडळ आयोजित दरवर्षी प्रमाणेच यंदाही त्याच उत्साहाने, एकजुटीने कुणबी शाखेच्या दिनदर्शिका -२०२४ चे प्रकाशन सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान, विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी  (पश्चिम ) मुंबई-४०० ०७९ येथे मा.श्री. भूषन बरे (संघाध्यक्ष), मा. श्री.अशोक वालम (बळीराज सेना राष्ट्रीय अध्यक्ष), युवा अध्यक्ष माधव कांबळे, वासुदेव साळवी  शाखा अध्यक्ष सोनू रामचंद्र शिगवण, सेक्रेटरी सचिन शिवगण, खजिनदार  चंद्रकांत भोज, उपाध्यक्ष वसंत राऊत, सदाशिव खांडेकर, शंकर मेणे, दत्ताराम थोरे, सह चिटणीस दिलीप बेलकर, सूर्यकांत सरफळे, अरविंद हरमले, रमाकांत शिवगण, उप खजिनदार संतोष रांबाडे, हिशोब तपासणीस राजेश बने, महिला शाखाध्यक्ष सौ.अश्विनी आत्माराम बाईत, सेक्रेटरी सौ.अक्षदा जागडे ,खजिनदार सौ.संजना कोळंबे, उपाध्यक्ष प्रज्ञा मळेकर, उप सेक्रेटरी अंजली थोरे, उप खजिनदार शुभांगी घाग, कुणबी यूवक मंडळ विक्रोळी - घाटकोपर पदाधिकारी, विवाह मंडळ पदाधिकारी, प्रकाश वालम, शाखा संस्थापक आत्माराम बाईत, दत्ताराम रामाने, मा. सेक्रेटरी सुरेश मांडवकर, बळीराज सेनेचे सत्यवान शिंदे, दिपीप कातकर, विवेक वालम, अविनाश घडशी, प्रशांत बाचीम, हर्षद म्हादये, अमर रेवाळे, कल्पेश भोज, सुहास बोळे, अमीत धनावडे, मनिष वालम, मंगेश मांडवकर, सचिन मनवल, संकेत धनावडे, कार्यालय प्रमुख अनंत खामकर, मनोहर वीर, शंकर सुवरे, जयवंत नाचणेकर, प्रसिद्धी प्रमुख शांताराम ल. गुडेकर, केतन भोज  यांच्यासह समाजोन्नती संघाच्या अनेक पदाधिकारी ,सदस्य ,सभासद व समाजसेवक सुनील बागवे सह विविध क्षेत्रातील अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

          त्यानिमित्त आबाजी कला वैभव (रजि) मु. रोहीणी, ता.म्हसळा, जि.रायगड प्रस्तूत कोकण  संस्कृती (बहूरंगी ऑर्केस्टा) सादरीकरण करण्यात आले. यामध्ये समई नृत्य, आदिवासी नृत्य, शेतकरी नृत्य, जाखडी नृत्य, पावनखिंड देखावा, छत्रपती शिवाजी महाराज राज्यअभिषेक सोहळा आदीचा समावेश होता. या सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमाला समाज बांधवानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

        समाजाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी युवाशक्तीला समाजाच्या प्रवाहात ओढण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला समाज बांधवानी बहुसंख्येने आपल्या परिवारासोबत उपस्थित राहून सहकार्य केले.हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी शाखेचे अध्यक्ष सोनु शिवगण, शाखेचे संस्थापक आत्माराम बाईत, शंकर मेणे ,चंद्रकांत भोज, कुणबी युवक मंडळाचे युवा शाखा संघटक मंगेश मांडवकर, वसंत राऊत, विवेक वालम, दिलीप कातकर, दिनेश राऊत, जनार्दन नाक्ती, भांबीड, संजय जाधव आदींनी  विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम चे सूत्रसंचालन सुरेश मांडवकर, चंद्रकांत भोज यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखा अध्यक्ष सोनू शिवगण यांनी करून कार्यक्रमची सांगता केली.

No comments:

Post a Comment

के. ईश्वर फाउंडेशन अंतर्गत न्यूरोथेरपी प्रशिक्षण व आरोग्य केंद्राची स्थापना !!

के. ईश्वर फाउंडेशन अंतर्गत न्यूरोथेरपी प्रशिक्षण व आरोग्य केंद्राची स्थापना !! **मुंबई, (प्रतिनिधी) : के. ईश्वर फाउंडेशन (एनजीओ)...