Monday 1 January 2024

नालासोपारातील महिलांसाठी मोफत शिवण, ब्युटी पार्लर व मेहंदी प्रशिक्षणाचा शुभारंभ !!

नालासोपारातील महिलांसाठी मोफत शिवण, ब्युटी पार्लर व मेहंदी प्रशिक्षणाचा शुभारंभ !!

*जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ..*

वसई , प्रतिनिधी : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षम असणे अत्यंत महत्वाचे असते. शिक्षण, आरोग्य, कला व रोजगार अशा विविध माध्यमातून महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण व्हावे या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकच्या वतिने व महिला शहर प्रमुख  रूचिता नाईक यांच्या प्रयत्नातुन नालासोपारा येथे महिलांसाठी मोफत शिवण (टेलरींग) ब्युटी पार्लर व मेहंदी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षणाचे उध्दघाटन जिजाऊ महिला सक्षमीकरण अध्यक्षा हेमांगीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महिला फक्त चुल, मुल, घर या चौकटीत न राहता तीच्या कलागुणांना वाव मिळावा महिलांच्या हाताला काम मिळणे गरजेचे आहे त्यांना घरबसल्या चार पैसे कमावता यावे. महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी यातुन शाश्वत उपजीविका निर्माण व्हावी यासाठी जिजाऊ संस्था नेहमी मदत करत असते.

हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे. कौशल्य आत्मसात केल्यानंतर प्रशिक्षक महिला  नोकरी करू शकेल अथवा स्वतःचा हिमतीवर व्यवसाय सुरू करून आणखी काही महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकेल या उद्देशाने हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

शिवण (टेलरींग) प्रशिक्षणासाठी महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी स्वखर्चातुन पाच शिलाई मशिन भेट दिली.
यावेळी जि.प आरोग्य व बांधकाम सभापती संदेश ढोणे, जेष्ठ पत्रकार रविंद्र माने रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र राऊत, शहर प्रमुख रूचिता नाईक, जिजाऊ संस्था तालुकाप्रमुख हर्षाली खानविलकर, विभागप्रमुख गणेश मुनगेकर, शाखा संघटक वंदना ढगे, महिला विभाग प्रमुख सुजाता जाधव, ब्युटी पार्लर प्रशिक्षक संगिता पासी, मेहंदी प्रशिक्षक हार्दी बुदियाल, स्वयंसेवक अमित नाईक अभिषेक गोरूले, कर्ना घरत व स्थानिक महिला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

अभिनेते विकास वायळ यांचा" संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई" पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !!

अभिनेते विकास वायळ यांचा" संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई" पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !! मुंबई, (शांताराम गु...