Monday 1 January 2024

डोंबिवलीतील किराणा दुकानावर प्रतिबंधीत गुटख्याची विक्री !!

डोंबिवलीतील किराणा दुकानावर प्रतिबंधीत गुटख्याची विक्री !!


डोंबिवली, मिनल पवार : गुटखा विक्री कायद्याने बंदी असताना येथील पश्चिमेतील देवी चौकातील एका किरणा दुकानदाराने आपल्या दुकानात विमल पान मसाल्याचा साठा करून त्याची विक्री केल्याबद्दल विष्णुनगर पोलिसांनी संबंधित दुकानदारा विरुध्द अन्न आणि सुरक्षा कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. दुकानदाराकडून ६९ हजाराचा पान मसल्याचा साठा जप्त केला आहे.

मनोज जगदशीप्रसाद गुप्ता (३५) असे आरोपी दुकानदाराचे नाव आहे. मनोज यांचे डोंबिवली पश्चिमेतील देवी चौकातील राम मंदिराजवळ लक्ष्मी सोहम इमारतीत किराणा दुकान आहे. देवी चौकातील मनोज गुप्ता हा दुकानात विमल पान मसाला हा महाराष्ट्र शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला मसाला विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या दुकानावर पाळत ठेवली होती.

मानवी आरोग्यास घातक असा पान मसाला विक्री करून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या बद्दल साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या आदेशावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांच्या पथकाने गुप्ता यांच्या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी त्यांच्या दुकानात विक्रीसाठी प्रतिबंधित विमल पान मसाल्याचा ६९ हजार रूपये किमतीचा साठा आढळून आला. विमल पान मसाल्याचा साठा जप्त केला. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे हवालदार शिरीष शिर्के यांच्या तक्रारीवरून दुकानदारा मनोज गुप्ता यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



No comments:

Post a Comment

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !!

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !! *** पेंढारकर कॉलेज मध्ये घडलेल्या घटनांच्य...