Tuesday 2 January 2024

हिट अँड रन ,कायद्याच्या विरोधात टँकर चालकाच्या संपाचा कल्याण परिसरात परिणाम, पेट्रोल पंपावर तूफान गर्दी !

हिट अँड रन ,कायद्याच्या विरोधात टँकर चालकाच्या संपाचा कल्याण परिसरात परिणाम, पेट्रोल पंपावर तूफान गर्दी !

कल्याण, (संजय कांबळे) : केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात टँकर व ट्रक चालकानी पुकारलेल्या बंदचा कल्याण शहर व कल्याण ग्रामीण परिसरात परिणाम दिसू लागला असून पेट्रोल पंपावर वाहन चालकांंनी तूफान गर्दी झाली आहे, यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना असा त्रास होऊ लागल्याने सरकारला शिव्याशाप दिला जात आहे.
केंद्र सरकारने टँकर व ट्रक चालकाला बाबतीत हिट अँड रन कायदा अस्तित्वात आणला आहे, याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार आहे, मात्र हा कायदा अन्यायकारक व जुलमी आहे असा आरोप करत ट्रक टँकर चालक मालक असोसिएशने तीन दिवसांचा संप सुरू केला आहे, याचा देशभर परिणाम जाणवू लागला आहे, परंतु याचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात जाणवू लागला आहे, विशेष म्हणजे कल्याण परिसरात व ग्रामीण भागात भयानक परिणाम जाणवू लागला आहे. कल्याण मधील शहाड उड्डाणपूल, प्रेम आँटो, जवळील पपांवर आज सकाळपासून मोटारसायकल व चारचाकी वाहने पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी तूफान गर्दी झालेली होती, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या,
अशीच परिस्थिती कल्याण मुरबाड मार्गावरील कांबा येथील पेट्रोल पंपावर दिसून येत होती, येथील टाटा पाँवर हाऊस व ताबोर आश्रम जवळील पंपावर लांब रांगा लागल्या होत्या. कल्याण परिसरात ५/६ पेट्रोल पंप असून येथील गर्दी बघून एक ते दोन तास पुरेल इतकाच इंधन साठा असल्याचे एका पेट्रोल पंप मालकाने सांगितले.

तर या संपात इतरही वाहन चालक सामील झाल्याने गँस, सिलेंडर, भाजीपाला, दुध या अत्यावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण होईल या भितीने नागरिक घाबरले आहेत, या संपात सहभागी होत असल्याचे निवेदन काही वाहन चालकानी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात दिले आहे. तर या संपाबद्दल शासनाकडून काही कळविले आहे का ते पाहतो असे कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्हाला त्रास दिल्या बद्दल नागरिकांनी शिव्यांची लाखोली सरकारला वाहिली आहे.

No comments:

Post a Comment

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !!

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !! *** पेंढारकर कॉलेज मध्ये घडलेल्या घटनांच्य...