Thursday, 25 January 2024

कल्याण पश्चिम येथे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्याचे आयोजन !!

कल्याण पश्चिम येथे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्याचे आयोजन !!

*तुमच्या आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी*


कल्याण, नारायण सुरोशी : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त साई हॉल, वायलेनगर, खडकपाडा, कल्याण पश्चिम येथे भव्य रोजगार महामेळाव्याचे आयोजन कल्याण पश्चिमचे मा. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत आयोजित करण्यात आला आहे.

नवी मुंबई, सेंट्रल, हार्बर, वेस्टर्न, ठाणे, कल्याण या परिसरातील ३० पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांचा सहभाग तसेच ४००० पेक्षा जास्त जागा ह्रोया जगार मेळाव्यात भरण्यात येणार आहेत. अगदी सर्वच क्षेत्रांतील कॉम्प्युटर, फायनान्स, बॅकिंग, सरकारी क्षेत्रातील, लॉजिस्टिक्स, हॉटेलिंग, मेडिकल, सिक्युरिटी, ड्रायव्हर, इंजिनिअर, ॲडमिनिस्ट्रेशन, क्लार्क, इत्यादी जॉब उपलब्ध असणार आहेत.

तरी या संधीचा लाभ जास्तीत जास्त तरुण, तरुणींनी घेण्याचे आवाहन शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी केले आहे.

यावेळी उमेदवारांनी (१) वैयक्तिक माहिती (बायोडाटा), (२) आधारकार्ड, (३) शैक्षणिक कागदपत्रे, (४) पासपोर्ट साईज पाच फोटो, (५) वरील कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक - 8080676865 / 7506471209





No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...