Thursday 25 January 2024

अखेर कारेगाव आश्रम शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल !!

अखेर कारेगाव आश्रम शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल !!

जव्हार, जितेंद्र मोरघा :

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कारेगाव शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी रुद्राक्ष पागी वय वर्षे १४ या विद्यार्थ्याने दोन लाडू घेतले म्हणून शिक्षक ललित आहिरे यांनी त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी घडली होती. सदर विद्यार्थ्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्या मारहाणी बाबतची माहिती सोशल मीडिया प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना, आदिवासी समाज पालघर जिल्हा संघटक अनंता वनगा यांनी कारेगाव आश्रम शाळेत जाऊन रुद्राक्ष पागी व त्याच्या आई वडिलांची भेट घेतली, रुद्राक्षाचे आई- वडील गरीब मजूर असल्याने भीतीपोटी त्यांनी या घटनेची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली नव्हती. अनंता वनगा यांनी त्यांना धीर देऊन खंबीरपणे मागे उभे राहाण्याचा विश्वास दिल्यानंतर व शिवसेनेचे आदिवासी समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संघटन जगदीश जोडी यांच्या मार्गदर्शनाखाली अनंता वनगा यांनी पाठपुरावा करून मारकुटा शिक्षक ललित अहिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती त्यानुसार रुद्राक्षचे वडील दत्ता पागी यांनी मोखाडा पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली आहे. मारकुटा शिक्षक ललित आहिरे यांच्यावर मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम ३२४, अल्पवयीन न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) कायदा ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी !

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी ! भिवंडी, दिं,१६,अरुण पाटील ...