Thursday 25 January 2024

महापालिका मुख्यालय व महापालिकेच्या विविध प्रभागात राष्ट्रीय मतदार दिन आज उत्साहात संपन्न !

महापालिका मुख्यालय व महापालिकेच्या विविध प्रभागात राष्ट्रीय मतदार दिन आज उत्साहात संपन्न !

कल्याण, नारायण सुरोशी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत  राष्ट्रीय मतदार दिन आज उत्साहात संपन्न झाला. निवडणूक प्रक्रियेतील नागरीकांचा सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून जनजागृती होण्यासाठी महापालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांस आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, शपथ देऊन मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ व अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांचे प्रमुख उपस्थितीत मुख्य लेखा परिक्षक लक्ष्मण पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, सहाय्यक संचालक नगररचना दिशा सावंत, महापालिका सचिव तथा उपायुक्त वंदना गुळवे, उपआयुक्त अर्चना दिवे, धैर्यशील जाधव, स्वाती देशपांडे, अवधुत तावडे, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, योगेंद्र राठोड, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी देखील मतदार दिनानिमित्त शपथ घेतली.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या इतर विभागात तसेच सर्व प्रभागातही संबंधित सहा.आयुक्त यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांनी देखील राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेतली.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी !

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी ! भिवंडी, दिं,१६,अरुण पाटील ...