Wednesday 24 January 2024

कल्याण मधील ताणतणाव प्रसंगात कसूर केल्याबद्दल दोन पोलिस निलंबित !!

कल्याण मधील ताणतणाव प्रसंगात कसूर केल्याबद्दल दोन पोलिस निलंबित !!


कल्याण, प्रतिनिधी : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता असावी कल्याण शहरात चोख बंदोबस्त पोलिस प्रशासनाने केला होता, असे असतानाही संवेदनशील अशा चिराग हॉटेल परिसरात तणावाचे व वादाचा प्रसंग निर्माण झाला. या प्रसंगाला जबाबदार धरत बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

एका गटातील काही तरुण आपली चार चाकी वाहने घेऊन त्याठिकाणाहून जात होते. या दरम्यान घोषणाबाजी सुरु केली. घोषणाबाजी ऐकताच दुसरा गट त्याठिकाणी आला. त्यावेळी या भागातून काही अज्ञात इसमांनी दुचाकीच्या दिशेने दगडफेक केली. यावरून या भागात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बाजारपेठ पोलीस ठाणे परिसर संवेदनशील असताना या भागात पोलीस तैनात असताना या घटना घडल्या आहेत. बंदोबस्तावरील पोलीस ही परिस्थि्ती तात्काळ आटोक्यात आणू न शकल्याने वरिष्ठांनी या भागात तैनात दोन पोलिस अनिल जातक व महादेव चेपटे यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित केले आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी !

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी ! भिवंडी, दिं,१६,अरुण पाटील ...