Wednesday 24 January 2024

मुरबाडमधील प्रसिद्ध म्हसा यात्रेला प्रांरभ, अवजड वाहनांना बंदी, ग्रामपंचायती तर्फे सोईसुविधा पुरविण्याचा प्रयत्न !

मुरबाडमधील प्रसिद्ध म्हसा यात्रेला प्रांरभ, अवजड वाहनांना बंदी, ग्रामपंचायती तर्फे सोईसुविधा पुरविण्याचा प्रयत्न !
.

कल्याण, (संजय कांबळे) : मुरबाड तालुक्यासह संपूर्ण ठाणे जिल्ह्या, गुजरात कर्नाटक, बिहार या राज्यांत सुप्रसिद्ध असलेल्या ठाणे जिल्ह्यातील म्हसा यात्रेला बुधवारी पौष पौर्णिमेला प्रारंभ झाला असुन शेकडो एकर जागेत भरणाऱ्या  गुरांच्या बाजारात लाखो किंमतीचे देखणे बैल पहावयास मिळत आहेत, १५/२० दिवस भरणारी ही एकमेव मोठी यात्रा असून याकरिता पोलिसांनी मुरबाड म्हसा या मार्गावरील अवजड वाहनांना बंदी घातली आहे तर यात्रेकरुना कोणत्याही प्रकारची अडचण येवू नये म्हणून म्हसा ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्यक सोईसुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.. 

शंकराचे देवस्थान असलेल्या खांबलिगेश्वराला म्हसोबा म्हणुन संबोधले जाते. हे देवस्थान जागृत असल्याने या देवाला अनेक जण नवस बोलतात. तो फेडण्यासाठी पौष पौर्णिमेच्या दिवशी नारळ वाहतात फोडतात त्याला तळी असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी या देवाला कोंबडा बकऱ्याचे बळी दिले जातात. त्याला गळ असे म्हणतात. त्याचाही नवस दिला जातो. तो नवस फेडण्यासाठी भक्त गण आपल्या नातेवाईकांना घेऊन म्हसा यात्रेत येतात व बळी दिलेला कोंबडा, बकरा तेथेच शिजवून खाल्ला जातो. तर काही जण आपल्या परिवारासह यात्रेत संसारपयोगी वस्तू शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदी करण्यासाठी येत असतात. त्यांचे मनोरंजनासाठी आकाश पाळणे, मौत का कुआ, तसेच इतर खेळ असतात, लाखो भक्तांचा जनसागर येत असतो, यासाठी पोलिसांनी या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. तर मुरबाड म्हसा मार्गावरील वाहतूक एचपी पेट्रोल पंपाजवळ पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. कर्जत तसेच टोकावडे जाणाऱ्या वाहनांनी उजव्या बाजूकडील डायव्हर्शन चा वापर करावा असे अवाहन पोलिसांनी केले आहे. 

तर यात्रेकरूंना शुध्द पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, सार्वजनिक शौचालय, रोडलाईट विशेष म्हणजे संपूर्ण यात्रेचा परिसर हा सी.सी.टी.व्ही कॅमेरात कैद असणार आहे. म्हसा ग्रामपंचायतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मुरबाड नगरपरिषद, कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांच्या कडे फिरत्या शौचालयाची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीचे ४ युनिट आहेत, कचरा उचलण्यासाठी घंटागाडी व २५ मजूरांची नेमणूक केली आहे. धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २ टँकरने पाणी फवारणी करण्यात येणार आहे. १५/२० दिवस ही यात्रा भरते यासाठी लाखो यात्रेकरू येत असतात, त्यामुळे भरीव अशा अनुदानाची गरज असल्याचे सरपंच दिनेश कुल्ले व ग्रामविकास अधिकारी शिवाजी टोहकेयांनी सांगितले..

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी !

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी ! भिवंडी, दिं,१६,अरुण पाटील ...