रोजगार हमी योजनेची कामे वाढवा - सभापती प्रदिप वाघ
जव्हार- जितेंद्र मोरघा
मोखाडा तालुक्यातील मनरेगा अंतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ यांनी सांगितले की तालुक्यातील रोजगार हमीचे कामे नियमित पणे सुरू राहतील तसेच मजुरांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या दृष्टिकोनातून नियोजन केले पाहिजे तसेच बॅक खाते, आधार कार्ड, जॉब कार्ड याबाबत च्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्या अशी मागणी देखील करण्यात आली, तहसीलदार मयुर खेंगले व गटविकास अधिकारी कुलदीप जाधव यांनी देखील प्रत्येक विभागाचा आढावा घेत जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्यासाठी सुचना दिल्या.
या सभेला प्रदीप वाघ प्रभारी सभापती, मयुर खेंगले तहसीलदार, कुलदीप जाधव गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, सर्व बॅकांचे शाखाधिकारी,वनविभाग, बांधकाम विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रोजगार हमी विभागाचे कर्मचारी, तालुक्यातील सामाजिक संस्था चे पदाधिकारी, व रोजगार सेवक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment