Wednesday, 24 January 2024

कृष्णा राघो कदम यांचे दुःखद निधन !

कृष्णा राघो कदम यांचे दुःखद निधन !

मुंबई (प्रतिनिधी) :

          रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील कासारकोळवण गावचे नागरिक कृष्णा राघो कदम यांचे आज दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. गावात, वाडीत सर्वजण त्यांना आपुलकीने  कदम मामा म्हणून बोलत. कदम मामा हे असे व्यक्तिमत्व होते की कासार कोळवण व मुंबई स्थित कोकणातली लोककला नाच, तमाशा वारसा जोपासण्यासाठी त्यांचा मोठा वाटा होता. लग्नकार्य विधी, वरात असो किंवा कोणतीही मिरवणूक असो त्यावेळेचे वाद्य- ताश्यावर उत्कृष्ठ मोहरम नाच करून लोकांचे मनोरंजन करण्यात ते अग्रेसर असायचे. तसेच ते बांधकाम करण्यात कुशल कामगार होते.

           त्यांच्या पश्चात तीन पुत्र चंद्रकांत, रोशन, संतोष व नातवंड असा मोठा परिवार आहे. आज त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर  कोसळला आहे, त्यांना दुःख पचविण्याची शक्ती परमेश्वर देवो त्यांच्या दुःखात आम्ही सर्व कासार कोळवण गावातील रहिवाशी, मुंबईकर तसेच मोहन कदम आणि कदम कुटूंबातील सर्वं सदस्यांसोबत आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली असून अनेकांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...