Tuesday 23 January 2024

मराठा आरक्षण यात्रेदरम्यान २६ जानेवारी रात्री ११ वा.पर्यंत नवी मुंबईत वाहनांना प्रवेश बंदी !!

मराठा आरक्षण यात्रेदरम्यान २६ जानेवारी रात्री ११ वा.पर्यंत नवी मुंबईत वाहनांना प्रवेश बंदी !!

भिवंडी, दिं,२४, अरूण पाटील (कोपर) :
             मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा मुक्काम  लोणावळ्यात असणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला असून या यात्रेत लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले आहेत.
             मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी मनोज जरांगेंची  पदयात्रा २५ जानेवारी रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल होणार आहे. या साठी २५ जानेवारीला रात्री १२ ते २६ जानेवारीला रात्री ११ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय वाहनं उभी करण्यास तसंच शहरातील सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास बंदी आहे. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. 
             मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. जरांगेचा आज लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला आहे. आरक्षणासाठी गोळ्या झेलायलाही तयार आहे असा थेट इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. या मोर्चात शेकडोच्या संख्येने मराठा बांधवही सहभागी झाले. जालनाच्या अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा बीडवरुन, अहमदनगरमार्गे पुण्यात दाखल झाले.
              गुरुवार २५ जानेवारी रोजी हा मोर्चा नवी मुंबईत धडकणार आहे. त्यावेळी मराठा आंदोलकांच्या मुक्कामाची सोय ही नवी मुंबईत करण्यात आली आहे. नवी मुंबईतली मैदानं, सामाजिक सभागृहं, शाळा, एपीएमसी मार्केट या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या निवासाची, जेवणाची आणि त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

2 comments:

श्री व सौ.कोमल प्रदिप टोंपे यांच्या त्रिवेणी नगर, मालाड (पूर्व) येथील घरी सप्तश्रृंगी आईच्या दर्शनाने भाविक आनंदी !!

श्री व सौ.कोमल प्रदिप टोंपे यांच्या त्रिवेणी नगर, मालाड (पूर्व) येथील घरी सप्तश्रृंगी आईच्या दर्शनाने भाविक आनंदी !! "पत्रकार व समाजसेव...