Saturday 6 January 2024

आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते बिर्लागेट येथे आर्क व्हिजन शाँपचे उद्घाटन, पावशेपाडा येथील आगरी समाजातील तरुणांच्या कर्तृत्वाचा ठसा !

आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते बिर्लागेट येथे आर्क व्हिजन शाँपचे उद्घाटन, पावशेपाडा येथील आगरी समाजातील तरुणांच्या कर्तृत्वाचा ठसा !


कल्याण, (संजय कांबळे) : नेहमीच इतरांनपेक्षा वेगळे काहीतरी करुन दाखविण्याची जिद्द असलेल्या कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा गावातील आगरी समाजातील उच्च शिक्षित तरुण विशाल सुदाम भोईर, स्वराज सुदाम भोईर आणि अनिकेत गणेश भोईर यांच्या आर्क व्हिजन शाँपचे उद्घाटन उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार कुमार आयलानी यांच्या शुभहस्ते नुकतेच ओळेकर काँम्लेक्स, सेंच्युरी रेआँन हाँस्पिटल समोर बिर्लागेट येथे झाले, यावेळी परिसरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


ठाणे जिल्ह्यातील आगरी समाज म्हटलें की, काही दोष लावले जातात, परंतु आता परिस्थिती खूपच बदलली आहे, सर्वानाच शिक्षणाचे महत्त्व कळाले आहे, त्यामुळे या समाजातून तरुण तरुणी शिक्षणाकडे वळू लागले आहेत, कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा येथील सुदाम विनायक भोईर, गणेश विनायक भोईर आणि दिलीप विनायक भोईर हे भाऊ सुरुवातीपासून उद्योग धंद्याकडे वळाले, उल्हास नदीचे मुबलक पाणी, व सहज मिळणारी माती यामुळे वीटभट्टी सुरू केली या व्यवसायात नाव कमावले, परंतु नैसर्गिक आपत्ती, शासकीय अडचणी, मजुरांची कमतरता, सिंमेट विटाचे आक्रमण यामुळे नाविलाजाने हा व्यवसाय त्यांनी बंद केला.


आगरी समाजाचे असूनही मितभाषी, शांत, संयमी, धार्मिक वृतीचे हे कुंटूबीय तालुक्यातील आदर्शवत मानले जात आहे. सुसंस्कृत असल्याने सुदाम भोईर व त्यांच्या इतर दोन बंधूंनी आपल्या मुलांना शिक्षण दिले, आज विशाल भोईर याची पत्नी सौ प्राजता भोईर ही डॉक्टर आहे, तर तर विशाल, स्वराज्य व अनिकेत हेआर्किटेक्ट व इंजिनियर्स झाले आहेत. त्यांनी आगरी समाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे, त्यांच्या आर्क व्हिजन या शाँपचे उदघाटन आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते झाले, यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी त्यांना जीवनात यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या आईवडिलांचे नाव उज्वल करण्याचा आशीर्वाद दिला.


याप्रसंगी शिवसेनेचे सदाशेठ सासे, भाजपाचे मंडळ अध्यक्ष महेश देशमुख, कांबा ग्रामपंचायतीचे संदिप पावशे, दिनेश वाळिंबे, अँड भरत भोईर, डॉ प्राजक्ता विशाल भोईर, रुपेश जाधव, आकाश गिते, संजय भंडारी, धनेश राऊत, रामदास पावशे  आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !!

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !! ** मानवतेला समर्पित भावनेतून निरंकारी मिशनतर्फे कोथरूड य...