Saturday 6 January 2024

मराठी पत्रकार दिनी पत्रकार संजय कांबळे यांचा सत्कार !!

मराठी पत्रकार दिनी पत्रकार संजय कांबळे यांचा सत्कार !!

कल्याण, प्रतिनिधी : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जंयती निमित्त अर्थात मराठी पत्रकार दिनी पत्रकार संजय कांबळे यांचा साईबाबा इंटरप्रायजेस च्या वतीने नुकताच शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, याशिवाय विविध शासकीय, निमशासकीय वरीष्ठ अधिकारी, कर्मचारी, विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू करून पत्रकारातेचा पाया मजबूत केला, त्यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने ६ जानेवारी हा मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो, याच निमित्त डोंबिवली येथील साईबाबा इंटरप्रायजेस चे  श्री मोहन शेठ यांनी पत्रकार संजय कांबळे यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या, यावेळी राकेश शेठ मोरे, मुरलीधर सोनावणे (मास्तर) राव मास्तर, आदी मान्यवर उपस्थित होते.

तर मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने राज्याचे विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते, अंबादास दानवे, शेतकरी सेवा सोसायटीचे सुरेश गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) संतोष शेलार, वंचित बुहजन आघाडीचे किशोर पंडित, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ठाणे जिल्हा अध्यक्ष अजय जाधव, सुरेश गायकर, ठाणे येथील अँड सचिन ससाणे, अस्थिरोग तज्ञ डॉ साळवी, गीनीज बुक आँफ रेकॉर्ड चे दिव्यांग गियाँरोहक केशव भांगरे, जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने, गटविकास अधिकारी प्रदिप पवार, गोवेली महाविद्यालयाच्या सौ गिता गायकर, कल्याण पंचायत समितीचे प्रवीण माळोदे, तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी चव्हाण,तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल थोरात, मोरेश्वर सुतार, नितलास शिसवे, विजय शिसवे, सुरेश जाधव, संजय घारे आदी नी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संजय कांबळे यांना शुभेच्छा दिल्या.यांवेळी संपूर्ण दिवसभर विविध पत्रकार संघटनानी अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

No comments:

Post a Comment

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !!

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !! ** मानवतेला समर्पित भावनेतून निरंकारी मिशनतर्फे कोथरूड य...