Friday 5 January 2024

आज साहित्य संघात "नमन" प्रयोग ; "शपथ या मंगळसुत्राची" एक भावनाप्रधान नाटयकृती होणार सादर !

आज साहित्य संघात "नमन" प्रयोग ; "शपथ या मंगळसुत्राची" एक भावनाप्रधान नाटयकृती होणार सादर !

_दरम्यान "एकता ग्रूप ( मुंबई )" संकल्पित "दिनदर्शिका - २०२४" प्रकाशन सोहळ्याचे आयोजन_

मुंबई - ( दिपक कारकर )

विविध लोककलांचे माहेरघर संबोधल्या जाणाऱ्या कोकणातील "नमन लोककलेचे" अनेक प्रयोग ग्रामीण सह मुंबई रंगभूमीवर सादर होण्याचा सुर आता सर्वत्र गवसला आहे.

गेली अनेक वर्षे शाहिरी अन् नमन कलेत आपल्या नावाची ओळख निर्माण करणाऱ्या चिपळूण तालुक्यातील कळंबट गावचे कलाप्रेमी व्यक्तीमत्व शाहीर प्रकाश घाणेकर कलेच्या प्रवाहात तळमळीने काम करत असतात. त्यांच्या माध्यमातून काही वर्षापूर्वी निर्मित झालेल्या "ओंकार कलामंच ( मुंबई )" मंडळाने नमन लोककला जोपासण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे.उपरोक्त नमन मंडळाचा ह्या मोसमातील प्रथम प्रयोग आज शनिवार दि.०६ जानेवारी २०२४ रोजी,रात्रौ ०८ : ३० वा.साहित्य संघ रंगमंदिर, ( गिरगाव - मुंबई ) येथे सादर होणार आहे.स्त्री - पुरुष पात्रांनी नटलेल्या नमन प्रयोगात पारंपरिक खेळे सहित गण, गवळण व हृदयीस्पर्शी "शपथ या मंगळसुत्राची" हे काल्पनिक वगनाट्य सादर होणार आहे. हया कलाकृतीचे लेखन प्रकाश घाणेकर तर दिग्दर्शन रमाकांत घाणेकर यांनी केलं आहे.संगीताने उत्तमरित्या हि कलाकृती रसिक प्रेक्षकांना पाहणे पर्वणीच आहे. कला/ क्रिडा/सामाजिक/ शैक्षणिक/ सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या "नवतरुण विकास मंडळ, कळंबट - कुडूकवाडी" ( मुंबई ) तर्फे हे बहारदार आयोजन करण्यात आले आहे. ह्या सोहळ्याचे औचित्य साधत प्रतिवर्षी सामाजिक उपक्रम निधि संकलनकरिता "एकता ग्रूप, ( मुंबई )" तर्फे "दिनदर्शिका प्रकाशन - २०२४" मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. ह्या सोहळ्याचे सर्वांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विवेक आग्रे - ८०८०५९७१७३, प्रकाश घाणेकर - ९८७०४२३८३३ यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

कोकणची लोककला फुगडी -टिपऱ्या मधून जनजागृती करणारी होतकरु शक्तिवाली शाहिर कु.सोनाली महादेव सनगले !!

कोकणची लोककला फुगडी -टिपऱ्या मधून जनजागृती करणारी  होतकरु शक्तिवाली शाहिर कु.सोनाली महादेव सनगले !!   [रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर  तालु...