Friday 5 January 2024

आर.एन.गांधी हायस्कूल येथे "बालिका दिन" साजरा !!

आर.एन.गांधी हायस्कूल येथे "बालिका दिन" साजरा !!

मुंबई - ( दिपक कारकर )

मुंबईतील आर.एन.गांधी हायस्कूल राजावाडी,विद्याविहार - ७७ येथे अतिशय उत्साहात ३ जानेवारी २०२४ रोजी बालिका दिवस साजरा करण्यात आला.दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक परेश कुमार काळे, पर्यवेक्षक प्रल्हाद मोरे, शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग सी.आर.सी.ललिता शिर्के,टिळकनगर पोलीस ठाणे येथील निर्भया पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा पारसे,व निर्भया पथक अंमलदार महिला पोलीस हवालदार सुनीता शिंदे, शिक्षक व विदयार्थी ह्यांच्या उपस्थितीत शाळेत बालिका दिवस साजरा करण्यात आला. 

शाळेतील कलाशिक्षक अर्जुन सरस्वती धाकु माचिवले व शाळेतील कलाकार विदयार्थी ह्यांच्या मदतीने ज्ञानाई सावित्रीबाई फुले ह्यांचे चित्रण फलक लेखन खास विष्णू हावळे सर यांचे सरस्वती खडू बार्शी,जिल्हा सोलापूर येथील खडू वापरत खूप छान पद्धतीने केलेले चित्रण अनेकांना भावले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ !

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ ! कल्याण, सचिन बुटाला : ...