Saturday 13 January 2024

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सह शिंदे सरकारचा महाविकास आघाडीतर्फे गोवेली येथे निषेध !!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  सह शिंदे सरकारचा महाविकास आघाडीतर्फे गोवेली येथे निषेध !!

कल्याण, संजय कांबळे - काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला होता, हा निर्णय फिक्सिंग असल्याचा आरोप करत आज कल्याण तालुक्यातील गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे निषेध करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घटनाबाह्य सरकारचा देखील घोषणा देऊन निषेध करण्यात आला, यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील आठवड्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला, इतकेच नव्हे तर सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले यांची प्रक्षप्रतोद पदी केलेली निवड बेकायदेशीर ठरवली होती, ती सुद्धा नार्वेकर यांनी कायदेशीर ठरवली, हे सगळं फिक्सिंग असल्याचा आरोप करत राज्यभर नार्वेकर यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज महाविकास आघाडीतर्फे तालुक्यातील गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी त्यांचा निषेध करण्यात आला.या विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या पोस्टला काळे फासण्यात आलें तसेच शिंदे सरकार व केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ मिरकुटे म्हणाले, केंद्र सरकार व राज्य सरकार हे लोकशाही विरोधी सरकार आहे, नार्वेकरांच्या हा निर्णयाने हे सिद्ध केले आहे, हा निर्णय केवळ त्यांनी वाचून दाखवला, मात्र याची स्क्रीट ही दिल्ली वरुन आली असल्याचे सांगून या सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत गाडून टाका असे आवाहन त्यांनी केले.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जयराम मेहेर म्हणाले, हे घटनाबाह्य सरकार आहे, जनता यांना वैतागून गेली आहे, पक्ष फोडण्याचे काम भाजप करत आहे, याचा हिशोब येत्या लोकसभा निवडणुकीत जनता घेणार आहे. तर उबाठा गटाचे तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव म्हणाले, देशभर या सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निर्णयाने लोकशाहीची हत्या झाली आहे, जनता यांच्या पाठीशी नाही तरीही पंतप्रधान मोदी यांनी दाखवण्यासाठी बचत गटाच्या महिलांना जबरदस्तीने सभेला नेलें जात आहे, ही जबाबदारी ग्रामसेवक व बीडिओ यांना दिली होती, लोकांना आता पुर्ण कळून चुकले आहे की हे सरकार लोकशाही ला घातक आहे, पोलीस बळाचा गैरवापर करून सत्ता चालवत आहे, पण हे फार काळ टिकणार नाही, येत्या लोकसभा निवडणुकीत यांना याची जागा दाखवणारच असे ते म्हणाले, आमच्या साठी, ठाकरे हेच चिन्ह व तेच पक्ष आहे, त्यामुळे हे काही कालावधी साठी राहिले आहेत, असे त्यांनी सांगितले‌.

या आंदोलनात विश्वनाथ जाधव, जयराम मेहेर, सोमनाथ मिरकुटे, संतोष शेलार, संजय मोरे, ज्ञानेश्वर पाटील, कैलाश मगर, बळिराम फिरगांणे, सुरेश जाधव, नरेश सुरोशे, संतोष सुरोशे, रविंद्र टेंभे, भास्कर टेंभे,आविश जुआरी, रमेश बांगर, आदी शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...